अभिनेता कृष्णा मरकड दिसणार मुख्य खलनायकाच्या भूमिकेत !


अभिनेता कृष्णा मरकड दिसणार मुख्य खलनायकाच्या भूमिकेत !

तनुश्री मुव्हीज प्रस्तुत, मराठी चित्रपट, " येडुआईच्या नावानं " १८ फेब्रुवारी ला " स्टार ५ लाईव " या ओटिटी चॅनेलवर प्रदर्शित झाला आहे.

    नासिक::- अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी गावातील दिग्दर्शक राज भालेराव व तनुश्री मुव्हिज निर्मित  "येडू आईच्या नावानं" चित्रपटात नासिकचा अभिनेता कृष्णा मरकड मुख्य खलनायकाच्या भुमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. कृष्णा मरकड यांची ही भुमिका सर्वच प्रेक्षकांना खुप आवडली असुन प्रेक्षक त्यांच्या वर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. चित्रपटामध्ये कृष्णा मरकड, रणजीत रणदिवे, कल्पना भावसार यांसारखे व्यावसायिक कलाकार असुन सोबत शाहरुख पठाण, रश्मी जांभळे, स्वाती कदम, मिलिंद सोनवणे, प्रमुख भुमिकेत आहेत, चित्रिकरण कॅमेरामन संजय गायकवाडांनी व पोष्ट प्रोडक्शन नौशाद इनामदार आणि प्रमोद धोत्रे यांनी केलेले आहे.
   या चित्रपटाचे कथानक  पार्वतीचे रुप असलेली प्राचीन येडेश्वरी देवी वर आधारित आहे. देवीची भक्ती आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम चित्रपटात पहावयास मिळणार आहे. सर्व प्रकारच्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे असे  निर्माता  ऋषीकेश राहिंज यांनी सांगितले.
       या चित्रपटात नवीन कलाकारांना संधी देण्यात आली आहे. सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पहावा असे आवाहन अभिनेता कृष्णा यांनी केले आहे. दिग्दर्शक राज भालेराव यांच्या पुढील हिंदी हाॅरर चित्रपटातही कृष्णा मरकड यांची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
        चित्रपटासाठी ॲप डाऊनलोड करण्याची लिंक देण्यात आली आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.toutle.star5live

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

समग्र वारली चित्रसृष्टी प्रकल्पालासर्वतोपरी सहकार्य -ना. डॉ. गावित