पोस्ट्स

आई हे जगण्याचे शहाणपण देणारे संस्कारपीठ : प्राचार्य यशवंत पाटणे

इमेज
आई हे जगण्याचे शहाणपण देणारे संस्कारपीठ : प्राचार्य यशवंत पाटणे      नेवासा जि.अहमदनगर : “आई हे सेवेचे, समर्पणाचे आणि वासल्याचे प्रतीक असते, आई हे जगण्याचे शहाणपण देणारे संस्कारपीठ असून कर्तबगार लेकरे हेच आईचे खरे वैभव असते, लक्ष्मीबाई कानडे या मांगल्याचा मंत्र जपणाऱ्या आदर्श माता होत्या, त्यांच्या संस्कारातून घरदार समृद्ध झाले, आईचे मातृत्व हे मुलाबाळाच्या कर्तृत्वातून सिद्ध होत असते.”  असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक, व्याख्याते, प्राचार्य यशवंत पाटणे यांनी केले.    जेऊर हैबती ता.नेवासा येथे माजी जि.प.सदस्य तुकाराम शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली लक्ष्मीबाई कडूभाऊ कानडे यांच्या स्मृतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, बुलढाणा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे, जिल्हा कॉंग्रेसचे सचिव अंकुशराव कानडे, औरंगाबाद मनपाचे कनिष्ठ अभियंता शेषराव पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी बन्शी सातपुते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.     पुढे बोलताना प्राचार्य यशवंत पाटणे म्हणाले की,” ‘सध्या अतिरेकी चंगळवादाने जीवनसौंदर्याची आणि संस्कृतीची हान

२३ सप्टेंबर ला महाराष्ट्रात "राडा" बघायला मिळणार !!

इमेज
 २३ सप्टेंबर ला महाराष्ट्रात "राडा"  बघायला मिळणार !!        नाशिक ( प्रतिनिधी )- साऊथ स्टाईल कमालीची ऍक्शन आणि कॉमेडीसह सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' सिनेमा येत्या २३ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.  'राडा' सिनेमाने सोशल मीडियावर चांगलीच हवा करत राडा घातला आहे. चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर, आणि चित्रपटातील दमदार गाणी रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. आता रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी 'राडा' सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहे. पत्रकार परिषदेत अभिनेते मिलिंद गुणाजी,  आकाश शेट्टी, अभिनेत्री हीना पांचाळ या कलाकारांनी अशी माहिती दिली.     राम शेट्टी निर्मित 'राडा' या सिनेमाचा हिरो समा म्हणजेच अभिनेता आकाश शेट्टी- तुप्तेवार 'राडा' या सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण करत आहे. तर राम शेट्टी निर्मित, रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प - पडगीलवार कॉर्पोरेशन यांच्या या चित्रपटात आकाश शेट्ट

भारतीय कला प्रभावी असल्याचे युनायटेड किंग्डमचे डॉ. जॉफ्री फिशर, ले फिशर दाम्पत्य व ऑस्ट्रेलियाच्या फरझाना युसुफ या तीन परदेशी शिक्षणातज्ञांचे मत !

इमेज
भारतीय कला प्रभावी असल्याचे युनायटेड किंग्डमचे डॉ. जॉफ्री फिशर, ले फिशर दाम्पत्य व ऑस्ट्रेलियाच्या फरझाना युसुफ या तीन परदेशी  शिक्षणातज्ञांचे मत ! वारली कला ही प्रभावी चित्रभाषा !         नाशिक ( प्रतिनिधी )- युनायटेड किंग्डमचे डॉ. जॉफ्री फिशर, ले फिशर हे दाम्पत्य व ऑस्ट्रेलियाच्या फरझाना युसुफ या तीन आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञांनी वारली चित्रशैली अभ्यासक संजय देवधर यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांनी महाराष्ट्राची आदिवासी वारली कला जाणून घेतली. भिंतीवर केलेले चित्र व विविध रेखाटने, तारपा वाद्य बघून ते मोहित झाले. वारली चित्रशैली ही प्रभावी चित्रभाषा असून त्यातील कथाविश्व जगाला कवेत घेणारे आहे असे त्यांनी नमूद केले. नव्या भारतीय शैक्षणिक धोरणात कलानिर्मितीला महत्वाचे स्थान असेल त्याचे स्वागत केले पाहिजे असेही मत त्यांनी मांडले. सुचित्रा देवधर यांनी भारतीय संस्कृतीनुसार कुंकूमतिलक लावून त्यांचे औक्षणाने स्वागत केले. सुप्रिया देवधर हिने विविध चित्रांचा तपशीलवार आढावा घेतला. संजय देवधर यांनी शंकानिरसन करून वारली चित्रसृष्टीची सफर त्यांना घडवून आणली.

'मृतकाचे नांव काय ?'विनोदाचा आस्वाद विनामूल्य घ्या !बाबाज् थिएटर्सच्या वर्धापनदिनानिमित्तपाच दिवसांचा ' रोटरी कल्चरल फेस्ट !

इमेज
'मृतकाचे नांव काय ?' विनोदाचा आस्वाद विनामूल्य घ्या ! बाबाज् थिएटर्सच्या वर्धापनदिनानिमित्त पाच दिवसांचा ' रोटरी कल्चरल फेस्ट !        नाशिक ( प्रतिनिधी ) बाबाज् थिएटर्स या ख्यातनाम सांस्कृतिक संस्थेचा २२ वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने ५ दिवसांच्या ' रोटरी कल्चरल फेस्ट ' चे आयोजन करण्यात आले आहे. दि.१४ ते १८ सप्टेंबर दरम्यान प. सा. नाट्यगृहात दररोज सायंकाळी ५.३० वाजता हा विनामूल्य सोहळा होणार आहे. काल पत्रकार परिषदेत बाबाज् थिएटर्सचे अध्यक्ष प्रशांत जुन्नरे, रोटरी क्लब ऑफ नाशिकरोडच्या अध्यक्षा वर्षा जोशी, सचिव ज्ञानेश वर्मा यांनी अशी माहिती दिली.        दि.१४ रोजी ज्ञानेश वर्मा प्रस्तुत 'रागरंग 'हा हिंदी चित्रपटातील रागदारीवर आधारित कार्यक्रम होईल. दि.१५ रोजी रोहित पगारे लिखित व दिग्दर्शित ' मृतकाचे नाव काय ? ' या सामाजिक व विनोदी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे. दि.१६ रोजी ' एव्हरग्रीन लता - आशा '  ही सुरेल गीतांची मैफल अमोल पाळेकर व सहकारी सादर करतील. दि.१७ रोजी झी मराठी प्रस्तुत ' उत्सव नात्यांचा ' कार

समाजाने बौद्धिक संपदेची गुणात्मकता वाढवून विकास साधावा- सुहास शुक्ल !

इमेज
समाजाने बौद्धिक संपदेची गुणात्मकता वाढवून विकास साधावा- सुहास शुक्ल !         सिन्नर ( प्रतिनिधी) बौद्धिक संपदेबद्दल असलेला आत्मविश्वास, संस्कृती व आधुनिकता यांचा मेळ प्रगतीकडे नेतो. सुसंस्कार, सत्शील वर्तणूक आणि अंगभूत देशभक्ती हे ब्राह्मण समाजाचे विशेष गुण आहेत. त्यांची गुणात्मकता वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे. त्यातून व्यक्तिगत, सामाजिक आणि देशाचाही विकास साधता येईल असे प्रतिपादन नाशिक येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिक सुहास शुक्ल यांनी केले. सिन्नर येथील सीताराम मंदिर न्यासाच्या वतीने आयोजित ब्राह्मण समाजाच्या ३२ व्या गुणगौरव समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. ज्येष्ठ उद्योजक एम.जी. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास पत्रकार व वारली चित्रशैली तज्ज्ञ संजय देवधर, पी. एल. देशपांडे, ज्योतिषी संजय रत्नाकर व्यासपीठावर उपस्थित होते.      या कार्यक्रमात विविध शैक्षणिक स्तर, कला, क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळविणारे विद्यार्थी,  पारितोषिकांचे प्रायोजक योगिता व अभिलाष पंडित, तसेच सेवानिवृत्त व वयाचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या ज्ये

शिक्षण विभागातर्फे कविसंमेलन व मुशायऱ्याचे आयोजन !!

इमेज
शिक्षण विभागातर्फे कविसंमेलन व मुशायऱ्याचे आयोजन !!         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : करीरोड येथील शिक्षणाधिकारी कार्यालयातील सभागृहात बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमधील कवी, लेखक शिक्षकांसाठी कवी संमेलन आयोजित करण्यात आले. 'कल्पनेतून जग निर्माण झाले' या कवितेनं जग बदलले असे विचार मांडणारे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ त्यांच्या स्वरचित कवितेत म्हणतानाच 'माणसातला माणूस असा घडवत जाते कवितेतून खदखदून हसवताना नकळत डोळ्यातून अश्रू येणे भाग पाडतात. कंकाळ यांच्या कवितेनं रसिक श्रोत्यांना अंतर्मुख करत सभागृह जिंकून घेतलं.          शिक्षणाधिकारी राजू तडवी (मध्यवर्ती) यांनी हरीवंशराय बच्चन यांची कविता ऐकवून अभिजात कवितेचा अनुभव रसिकांना दिला. या कार्यक्रमाचे संयोजक मनपा अधीक्षक निसार खान यांनी शिक्षण विभागात कार्यरत कवी, शायर, लेखक ज्यांनी देशभर नाव कमावलं आहे त्यांचा उचित सन्मान व्हावा या उद्देशाने या सत्कार सोहळ्याचे, कविसंमेलनाचे आयोजन केल्याचे सांगितले.            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी किसन पावडे पाटील यांनी करून सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण

अलास्का हॉलमध्ये राजयोग मेडिटेशन शिबिराचे यशस्वी आयोजन !

इमेज
अलास्का हॉलमध्ये राजयोग मेडिटेशन शिबिराचे यशस्वी आयोजन !       नासिक ( सुचेता बच्छाव)::- चांदशी येथील भूमिपुत्र मंडलिक परिवाराकडून त्यांच्या अलास्का हॉल मध्ये ५ दिवसीय राजयोग मेडिटेशन आयोजन गणपती उत्सवानिमित्त करण्यात आले.       प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय संस्था, गंगापूर रोड सेंटरच्या संचालिका आदरणीय मनीषा दिदी यांनी परिसरातील नागरिकांना संबोधित केले. सकारात्मक विचार कसे करायचे, संकल्पशक्तीच्या माध्यमातून आपल्या जीवनाला चांगली दिशा कशी दाखवावी या बद्दल मार्गदर्शन केले.          अध्यात्मिक मार्ग ज्ञानातून आपल्याला सामाजिक मुल्ये, नैतिक मुल्ये जोपासून पुन्हा एक मुल्यानिष्ठ समाज निर्माण करू शकतो. प्रसादाचे महत्व सांगताना त्यांनी शुद्ध आणि सात्विक शाकाहाराचे महत्व पटवून दिले.        ध्यानधारणेच्या फायद्यांबद्दलही त्यांनी विश्लेषण केले. मेडिटेशन शिबिरात सुखद आणि सुखद अनुभव आल्याचे आणि आत्मिक शांती मिळाल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी शांतीलाल भाई, किरण भाई, अशोक भाई , नंदलाल भाई, नानाभाई, सुचेता बच्छाव बहेन, सोनी बहेन यांनी सहयोग दिला. शरद मंड