दातली येथील रिंगण सोहळा २५००० च्या उपस्थितीत उत्साहात पार पडला !! विठ्ठल भक्तीचा अपूर्व व डोळ्याचे पारणे फेडणारा उत्सव !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

पायी दिंडी प्रसिद्धी प्रमुख दीपक भावसार यांजकडून,,,,,,,,,

        सिन्नर(२)::-संत निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडी सोहळ्याचे पहिले गोल रिंगण सिन्नर तालुक्यातील दातली येथें अपूर्व उत्साह आणि निवृत्तीनामाचा गजर आणि विठ्ठलाच्या जयघोषात पार पडले.
      काल दातली ता.सिन्नर येथे मुक्कामी आलेली निव्रुत्तीनाथ पायी दिंडीचे आज रिंगण सोहळ्याचे सालाबादाप्रमाणे आयोजन असते, आज झालेल्या रिंगण सोहळ्यासाठी 25 हजारापेक्षा जास्त वारकरी आणि पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
        मानाच्या अश्वाकडून विठ्ठल नामाच्या जयघोषांत डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा उत्साहात पार पडला यांवेळी निव्रुत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष हभप संजय नाना धोंडगे, दिंडी अध्यक्ष हभप पंडीत महाराज कोल्हे, पालखीचे मानकरी बेलापूरकर, मानकरी जयंत गोसावी, एकनाथ महाराज गोळेसर, भगीरथ महाराद काळे, माधवदास राठी, श्रीपाद कुलकर्णी, शरद महाराज खालकर, संस्थानचे पदाधिकारी, विश्वस्त आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)