पंढरपुरच्या विठ्ठल दर्शनाला नासिकहून सायकल वारी चे सालाबादाप्रमाणे आयोजन,! सायकल प्रेमींना सोमवारपर्यंत (दि. ९ ) सहभागी होण्याचे आवाहन-प्रविणकुमार खाबिया, सायकलिस्ट वारकरी व यावर्षीचा संदेश सविस्तरतेसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

नासिक:(7)::-नासिक सायकलिस्ट व दातार कँन्सर जेनेटिक्स लिमिटेड यांच्यातर्फे संयुक्त विद्यमाने आषाडी एकादशी निमित्त नासिक ते पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले असुन सायकल प्रेमींनी सोमवार पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले असुन आतापर्यंत नासिक जिल्ह्यासह मुंबई, पुणे, ठाणे, सिन्नर, सायखेडा, निफाड, पिंपळगांव, संगमनेर, अहमदनगर, व जिल्हाभरांतून ४०० सायकल प्रेमींनी नोंदणी केली आहे.
          आयपीएस हरिष बैजल यांच्या संकल्पनेतून गेली सात वर्ष हा उपक्रम दरवर्षी नवीन संदेश घेऊन पार पडत आहे, यावर्षी झाडे लावणे (जगविण्याच्या उद्देशाने योग्य त्या ठिकाणी व जबाबदारी वितरीत करून)  तसेच शुन्य प्लास्टिक हा संदेश घेऊन सायकल वारी १३ जुलै रोजी सकाळी ६:०० वा. नासिक येथील गोल्फ क्लब मैदानावरून निघणार आहे.
        नासिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत माहीती दिली, यांवेळी दातार कँन्सर जेनेटीक्सचे मिलींद अग्निहोत्री, तसेच सकलिस्टचे सचिव नितीन भोसले, राजेंद्र वानखेडे, योगेश शिंदे, राजहंस, रत्नाकर आहेर उपस्थित होते.
       दरवर्षी सुधारीत स्वरूपात सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो, यावर्षी सौर उर्जेवर चालणारा सायकल रथ व त्या रथात राहुल फाटे गुरूजींच्या मंदिरातील विठ्ठल मुर्ती हे या वारीचे आणखी एक आकर्षण असणार आहे. वारीसोबत दोन अँम्ब्युलन्स, ४ डाँक्टर्स आपत्कालीन परिस्थितीतील सेवेसाठी सुसज्ज असल्याची माहीती दिली.
          विशेष कार्यक्रम हा वारीतील रिंगण हा असतो त्याप्रमाणे गेल्या वर्षी सायकल वारकरी रिंगणाचा यशस्वी प्रयोग राबविण्यात आला होता, तो याही वर्षी, पंढरपूर जवळच्या खेडलेकर महाराज आश्रमाच्या मैदानावर होणार असुन वारकऱ्यासहीत पंचक्रोशितील नागरिक मोठ्या उत्साहाने रिंगण कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी येतात व नासिकचा सायकलिस्ट विठ्ठल पंढरपुरच्या विठ्ठलाच्या भेटीस सायकल वारकऱ्याच्या माध्यमातून जातो ही विलक्षण संदेश वारी चे ग्रामस्थांकडून ठिकठिकाणी स्वागत केले जाते, आरोग्य वारी अशी दिसतांना छोटी पण मानवी निरोगी जीवनासाठीची मोठी वारी हरिष बैजल यांच्या संकल्पनेतून होत आहे ती लवकरच सातही वारी मार्गावरून सुरू व्हावी म्हणजे खऱ्या अर्थाने सशक्त समाज निर्मितीला हातभार लागेल असे प्रविणकुमार खाबिया यांनी मत मांडले.
वारीचा कार्यक्रम- १३ जुलैला सकाळी सहा वाजता नासिक येथील गोल्फ क्लब मैदानावरून अहमदनगर मुक्कामी, १४ जुलैला टेंभुर्णी मुक्कामी व १५ जुलैला सकाळी विठुरायाच्या दर्शनासाठी पोहचेल.

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ! ८ जानेवारीला देशव्यापी संप !! अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!