लोकसभा उमेदवारांची खरी परीक्षा सुरू !! गुन्ह्यांची कुंडली प्रकाशित करावी लागेल !! सविस्तर माहितीसाठी खालील ब्लाॅगवर क्लिक करा !!!

आता खरी परीक्षा !
लोकसभेच्या निवडणुकीत जे उमेदवार नशीब अजमावणार त्यांना निवडणूक आयोगाच्या नियमांत राहून पुढील वाटचाल करावी लागणार आहे.
           जाहीरात देणे बंधनकारक केले आहे म्हणजे सर्वच प्रकारच्या असे नाही तर स्वत:वरील गुन्हे, प्रलंबित गुन्हे याबाबत १२ चा फाँन्ट असलेल्या तीन जाहीराती व त्याही स्थानिक दैनिकांत देणे बंधनकारक केले आहे, याचा फटका प्रस्थापित बाहुबली समजले जाणाऱ्या उमेदवारांनाच जास्त बसण्याची शक्यता आहे, दोन दिवसापासुन सोशियल मिडीया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे, "मै चौकीदार व मै जमानत पर" , आता अशा पोस्ट जर जाहीरातींच्या आधीच शेअर होत आहेत व स्थानिक दैनिकांत ततीन वेळा ज्या जाहीराता प्रकाशित होतील त्या सर्वसामान्यांच्या हातात "सकाळच्या" पहिल्या चहासोबतच वाचायला मिळणार याचा परिणांम स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही.
        उमेदवार आपली माहीती लपवू शकत नाही, त्याच्यावरील असलेल्या गुन्ह्यांची माहीती तो स्वखर्चाने स्वत:च देणार म्हणजेच यांपुढील होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी तरी आपले चरीत्र स्वच्छ असावे ही भावना नवतरूणांमध्ये रूजविण्यात निवडणूक आयोग यशस्वी होण्याचे निश्चित आहे, जगातील सर्वात मोठी भारतीय लोकशाही प्रगल्भ होत असल्याचेच द्योतक नाही काय ? याचा "लोकमताकडून"  नक्की स्वीकार केला जाईल, आपला उमेदवार किती लायक अथवा नालायक आहे याचा निर्णय घेऊ शकतो. आणी हीच डोकेदुखी अनेक उमेदवारांपुढे "आ"  वासून उभी आहे, याचा "सामना" कसा करावा यांतच त्यांची मोठी शक्ती खर्ची पडणार असुन हा "प्रहार" कसा परतावायचा ?  "महानगरावर" कुणी वैयक्तिक सत्ताधीश आजघडीला निर्माण होऊ शकत नाही, साधे एखाद्या खेड्यातले "गांवकरी" सुद्धा एकमताचे नसतात, सतत तेथेही "लोकमंथन" करीत असतात, तेव्हा उमेदवारांच्या गुन्ह्यांच्या जाहीरातीवरून कितपत विरोधकांकडून  आरोप प्रत्यारोप होतील ?  की मतदार म्हणजे "लोकसत्ता" आहे, तिला सर्व माहीत आहे, आरोप करण्याची आवश्यकता नाही ? असे समजून प्रचार करतील काय ? उत्तर लवकरच मिळेल ! असो, *"न्यूज चा मसाला"*  या "पुण्यनगरीत" (भारत देश) आपणांस नेहमीच नवनवीन विचार प्रदान करीत राहील, "देशदूता" ची भूमिका सदैव पार पाडीत खरा दूत या नात्याने "दिव्य" कार्य करीत राहील, "भ्रमरा" सारखा सुर्यास्ता पर्यंत आपल्या अवतीभवतीच असेल.
(सक्षम लोकशाहीसाठी योगदान देत असलेल्या भारतवर्षातील पत्रकारितेतील सर्वांचे आभार, चु.भू.दे.घे.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !