सर्वच जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना पदवी पर्यंत मोफत शिक्षण द्यावे- छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेची मागणी ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!


सर्वच जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना पदवी पर्यंत मोफत शिक्षण द्यावे- छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेची मागणी !!
             नासिक::- आपल्या 'व्यवस्थेतच ' भयानक दोष आहे. मराठा समाजासह धनगर ,आणि मुस्लिम आरक्षणाचे प्रश्न मार्गी का लागत नाहीत ? शेतकऱ्याच्या बांधावर स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे पाणी का गेलं नाही ? त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव का मिळत नाही ? असे अनेक प्रश्न राज्या समोर आ वासून उभे आहेत.आणि दुसऱ्या बाजूला या समस्यांना सामोरे जात असताना पर्याय मिळत नसल्याने या प्रत्येक समाजातील घटक जीवन संपविण्याचा निर्णय घेत गळ्याला फास लावून घेत आहे.एकामागून एक माणूस अशा पध्दतीने स्वतःला संपवू लागला तर शासन नावाची व्यवस्था प्रेतांवर राज्य करणार आहे का? अशा ओसाड मनोवृत्तीचा कारभार सुरू असेल तर आपल्या सर्वांना आपल्या राजकारणाचा, समाजकारणाचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे,आपण हा सारा उपद्व्याप का आणि कुणासाठी करतो आहोत? म्हणूनच समाजाच्या पदरात त्याच्या हक्काचे योग्य दान टाकण्याचे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे.पहिली पायरी म्हणून सध्या ऐरणीवर असलेला मराठा, धनगर,  मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेल तेंव्हा लागेल तत्पुर्वी कुठलाही जात अभिनिवेश न बाळगता सर्वच जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना पदवी पर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय महायुतीच्या शासनाने चालू अधिवेशनातच जाहीर करावा.अशा मागणीचे विनंती वजा निवेदन छावा क्रांती वीर सेनेने मुख्यमंत्र्यांना  काल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिले.
उस्मानाबाद येथील देवळाली गावातील मराठा समाजातील युवक अक्षय शहाजी देवकर याने आपले आयुष्य संपवले आहे.  नुकत्याच झालेल्या दहावीच्या परिक्षेत त्याला ९४%गुण मिळून सुध्दा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता, त्याच प्रमाणे यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने महाविद्यालयाचे प्रवेश शुल्क भरु शकत नसल्याने निराश होऊन त्याने आपली जिवनयात्रा संपवली.
डोनेशन देऊन प्रवेश घेण्यासाठी पैसे नाही म्हणून आत्महत्या करणारे असंख्य विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलत आहेत हे आंधळ्या शासनाला दिसत नाही का ?
दुष्काळी परिस्थिती असल्याने महाविद्यालयाचे प्रवेश शुल्क भरु शकत नसल्याने लाखो विद्यार्थी आहेत ज्यांना हा प्रश्न भेडसावत आहे.आरक्षणामूळे मराठा समाजाची होत असलेली घुसमट पुन्हा एकदा समोर आली आहे.केवळ मराठाच नाही तर धनगर आणि मुस्लिम समाजातील अनेक होतकरू "अक्षय" या व्यवस्थेचे बळी ठरत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. ज्यांच्यामुळे या राष्ट्राचे भविष्य सुरक्षित राहील ते युवक आणि ज्यांच्या मुळे आपलं आज जीवंत असणं सुरक्षित आहे ते शेतकरी , ह्या सर्वांना असुरक्षित कां वाटतंय ? कां म्हणून ते स्वतःला संपवत आहेत. नेत्यांसोबत प्रशासन सुद्धा या परिस्थितीला  तेवढंच जबाबदार आहे.त्यांनी देखील आपण या समाजाचे घटक आहोत,समाजाने केलेल्या त्यागामुळेच आपण प्रशासनात आहोत हे लक्षात घेऊन समाजहितासाठी जगण्याची तयारी दाखवली पाहिजे. 'शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये ' असं शिवाजी महाराज अधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले होते , ते आजही तंतोतंत खरे आहे.हे नजरेसमोर ठेवून प्रशासनाने वाटचाल करावी असे म्हटले आहे.
               स्कॉलरशिप देण्याच्या नावाखाली त्यात देखील मोठा भ्रष्टाचार शिक्षण संस्थाकडून होतांना दिसून येत आहे.मग केंद्र व राज्य सरकार हे डिजीटल युगाकडे कूच करत असताना आधी घायचं मग नंतर वेळ निघून गेल्यावर द्यायचं त्यातही अनियमितता असा शिरस्ता शासन व प्रशासनाने राबविणे सुरू ठेवल्याने देशाची अवस्था सुधारणे हे कोणालाही जमणार नाही म्हणून छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेच्या वतीने आपणा द्वारे विनंती करण्यात येते की देशात ज्या प्रमाणे एक देश एक निवडणूक असा नारा दिला जात आहे तर मग शुद्ध हेतूने सर्वच जातीच्या मुला, मुलींना १ ली ते पदवी पर्यंत चे शिक्षण मोफत का देऊ नये ?
या मागणीचा शासनाने व प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा.अशी छावा क्रांतीवीर विदयार्थी सेनेच्या वतीने विनंती करण्यात आली आहे. यावेळी छावा क्रांतीवीर विद्यार्थी सेनेचे प्रदेश अध्यक्ष उमेश शिंदे,  संस्थापक अध्यक्ष करण गायकर , प्रदेश उपाध्यक्ष संतोष माळोदे, प्रदेश संघटक नितीन सातपुते, विजय खर्जुल जिल्हा अध्यक्ष ,सागर पवार वि.आ.जिल्हा अध्यक्ष,सोमनाथ पवार वि. आ. ग्रा जि अध्यक्ष,निवृत्ती शिंदे,नितीन लांडगे.उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाच्या भुजबळांविषयी काढलेल्या प्रसिद्धिपत्रकाचा भुजबळ समर्थकाकडून जाहीर निषेध ! भाजपाच्या फुटकळ दलालांनी सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये असे प्रत्युत्तर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!