नासिकचे सुनील वाजे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनील वाजे तर इगतपुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे

नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत सुनील वाजे यांची प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून तर नाशिकच्या इगतपुरी तालुका अध्यक्ष पदी बाळासाहेब गाढवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

          राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आ.छगनराव भुजबळ व प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या सुचनेनुसार नाशिक लोकसभा अध्यक्ष कोंडाजी (मामा) आव्हाड यांनी बाळासाहेब गाढवे यांना तालुकाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र दिले आहे. तर प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, आ.छगनराव भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी सुचविल्याप्रमाणे सुनील वाजे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. वाजे व गाढवे यांच्या नियुक्तीचे राजकीय वर्तुळातून अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील ३७ महिलांना 'कर्तृत्ववान महिला पुरस्कार' जाहीर ! मुंबईच्या रोहिणी पराडकर तसेच नाशिकच्या डॉ. नाझिया सय्यद व पूजा पवार यांनाही पुरस्कार जाहीर !

शहरातील बड्या विकासकाने जमीन हडप केल्याचा सुनिता दोंदे यांचा आरोप, न्याय न मिळाल्यास दिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा !

सबलांना मानाचा सलाम ! आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्राध्यापक विजय कोष्टी यांचा लेख