न्यूज मसालाची बातमी व नियोजन समिती सदस्य यांनी केलेल्या आरोपांची जिल्हा परिषदेकडून दखल !! निव्वळ फार्स की ठोस कार्यवाही ची चर्चा !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

न्यूज मसालाची बातमी व नियोजन समिती सदस्य यांनी केलेल्या आरोपांची जिल्हा परिषदेकडून दखल !!

नासिक::-   ४ फेब्रु. व ६ फेब्रु. १९ ला न्यूज मसालाने प्रकाशित केलेल्या बातमीची अखेर प्रशासनाकडून दखल घेण्यात आली. यासाठी प्रशासनाला तब्बल साडेपाच महिन्यांचा कालावधी लागतो याबाबत जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागात कुतुहलाचा विषय ठरला असून सदर रस्ता व त्याची प्रशासनाकडून करण्यात आलेली पाहणी हा निव्वळ फार्स ठरेल की संबंधितांवर कारवाई करण्यात येईल अशी चर्चा सुरू आहे.
          त्र्यंबक तालुक्यातील वरसविहीर ते बोरपाडा रस्ता जिल्हा परिषदेच्या ठेकेदाराकडून बनविण्यात आला व तोच रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराकडून ही बनविला आहे असा आरोप नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर यांनी ग्रामस्थांच्या व जिल्हा परिषद प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य रुपांजली माळेकर यांनी सदर कामाची व फसवणुकीच्या चौकशीची वारंवार मागणी केली असता अखेर शुक्रवारी (दि.१२) चौकशी समितीने पाहणी केली.  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी चौकशी समिती स्थापन करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार समितीने पाहणी केली.
         समितीने केलेल्या पाहणीतील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने की जिल्हा परिषदेने तयार केला आहे याचे उत्तर अहवालानुसार समोर येईल मात्र दोन्ही विभागात होत असलेल्या चर्चेने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत,
१) रस्ता एकच आहे की वेगवेगळा,
२) दोन्ही विभागात ठेकेदार एकच आहे की वेगवेगळा
३) प्रशासनातील झारीचे शुक्राचार्य कोण ?
४) दोष साबां की जिप प्रशासनाचा ? 
५) कारवाई कशी व कोण करणार ?
६) या प्रकरणात तथ्य आढळल्यास इतरही कामांची संयुक्तपणे चौकशी होणार का ?
७) ठेकेदार व प्रशासनाची मिलीझुली असण्याची शक्यता नाकारता येईल का ?
८) असल्यास कोणती उपाययोजना करणे उचित ठरेल ?
९) दोषींना काळ्या यादीत टाकणे, निलंबित करणे अशी मर्यादित वा कठोर कारवाई करण्यात येणार ?
+++++++++++++++++++++++++++++++++++

४ फेब्रुवारी २०१९ च्या बातमीची लिंक----
     जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ म्हणावा काय ?आरोप-एकाच रस्त्याची दोन्हीकडे काढली बीले- विनायक माळेकर.     (क्रमश:)                                    बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! https://www.newsmasala.in/2019/02/blog-post_4.html

+++++++++++++++++++++++++++++++++++

६ फेब्रुवारी २०१९ च्या बातमीची लिंक
     भाग-२रा,   ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या परिपत्रकाचा जिल्हा परिषद व सार्वजनिक विभाग कसा अर्थ काढते यांकडे सर्वांचे लक्ष !                                                      सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! https://www.newsmasala.in/2019/02/blog-post_6.html

+++++++++++++++++++++++++++++++++++

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।