सुविचार गौरव पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

सुविचार गौरव पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 
नाशिक दि. ०३ (प्रतिनिधी) :-कला, क्रीडा, कृषी, साहित्य, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, प्रशासन व उद्योग अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी सुविचार गौरव पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे तसेच नावे सुचविण्याचे आवाहन सुविचार गौरव मंचचे अध्यक्ष अॅड. अशोक खुटाडे यांनी केले आहे.
             समाजासाठी अविरतपणे झटणाऱ्या सर्वसामांन्यांमधील आदर्श व्यक्तींना पुरस्काराने सन्मानीत करून त्यांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. सोमवार दि. ०८ जुलै २०१९  पर्यंत हे प्रस्ताव एफ-१०, नानाजी शेटे बिझीनेस सेंटर, कॅनडा कॉर्नर, नाशिक या कार्यालयात सकाळी १२ ते ३ या वेळेत प्रत्यक्ष सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
            यापूर्वी नाशिक येथे आयोजित शानदार कार्यक्रमात सन २०१७ मध्ये  माजी केंद्रीय मंत्री खा.प्रफुल्ल पटेल यांच्या शुभहस्ते तर सन २०१८ मध्ये माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुभहस्ते “सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा” संपन्न झाला होता. यात हिंदी चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री मधुर भांडारकर, अभिनेते स्वप्नील जोशी, संगीत दिग्दर्शक व गायक  अनु मलिक, अभिनेते अभिजित खांडकेकर, प्रा.डॉ.एम.एस.गोसावी, डॉ.राहुल कैचे, महिला क्रिकेटपटू माया सोनवणे, दीपक बागड, विश्वास ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना सुविचार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
               पात्र व्यक्तींनी आपले प्रस्ताव, सर्व कामे व आपल्या क्षेत्रातील आपण केलेल्या संपूर्ण माहितीसह वरील पत्त्यावर मुदतीत पाठवावे. आलेल्या प्रस्तावांमधून निवड समितीने निवडलेल्या पुरस्कारार्थीना एका भव्यदिव्य व शानदार कार्यक्रमात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबत निवड समितीचा निर्णय अंतिम राहील असेही संस्थेच्या पत्रकात म्हटले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी मोबा. ९४२१५६३५५५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रसिद्धीसाठी देण्यात आलेल्या पत्रकात शेवटी करण्यात आले आहे.   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

शिक्षक रत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन !