पुरेसा पाऊस न झाल्याने टँकर लागण्याची शक्यता असल्यास टँकर वाढविण्यासाठी तालुक्यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

नाशिक : - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी आज जिल्हयातील पाणी टंचाईबाबत तालुक्यांचा आढावा घेवून विविध सुचना केल्या. जिल्हयात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही त्यामुळे काही तालुक्यांमध्ये टँकर लागण्याची परिस्थिती असून गटविकास अधिका-यांच्या आढाव्यामध्ये जिल्हयात १४ टँकर लागण्याची शक्यता असल्याने टँकर वाढविण्याची  गरज असल्यास तालुक्यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शितल सांगळे यांनी यावेळी दिले.
           जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक तालुक्याचा आढावा घेताना पाणी टंचाईबाबत राबविण्यात येत असलेल्या उपयायोजनांची माहिती घेवून प्रत्येक गावाला पाणी पुरवठा होईल यासाठी जबाबदारीने काम करण्याचे तसेच कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना पाणी टंचाईबाबत दिलासा देण्यासाठी विशेष उपायोजना करण्याचे निर्देश शितल सांगळे यांनी यावेळी दिले.
                यावेळी पर्जन्यमानाबाबत माहिती घेवून विंधन विहिरींचाही आढावा घेण्यात आला. पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी विंधन विहिरी घेणे, नळपाणी योजनांची विशेष दुरूस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरूस्ती करणे, प्रगतीपथावरील योजना शीघ्रगतीने पूर्ण करणे आदि उपायोजना करण्यात आल्या आहेत याबाबत या बैठकीत तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. 
              जिल्हयात जुनपर्यत ३९७ टँकर सुरु होते मात्र ५ जुलैपर्यत यातील ९७ टँकर कमी झाले आहेत. मात्र तरीदेखील सिन्नर, बागलाण, नांदगाव, येवला, मालेगाव व देवळा तालुक्यात अतिशय कमी पाऊस झाल्याने या तालुकयांमध्ये आजच्या आढाव्यानुसार १४ टँकर लागण्याची शक्यता असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सांगितले. बैठकीस ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकुर, सर्व तालुक्यांमधील गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागांचे उप अभियंता आदि उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!