जमीन विकून आलेल्या पैशाचा "माज" काय असतो ? "माज...फिनिश इट" नक्की काय आहे ? सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

जमीन विकून आलेल्या पैशातून जो "माज" येतो व आयुष्य काय वळण घेते, हा "माज" आजच्या तरुणाईला काहीतरी संदेश देणारा ठरेल असे आशिष जैन यांना वाटते.
आशिष जैन हे दिग्दर्शक असलेल्या "माज-फिनीश इट" या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नाशिक येथे आले असता त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
        गेली काही वर्षे हा विषय समाजात नैराश्य निर्माण करणारा तर काहींना जमीन विकून आलेल्या पैशांनी नवीन व्ययसायात गुंतवणूक करुन यशाची शिखरे पादाक्रांत केलीत मात्र अनेकांचे आयुष्य बर्बाद झाले आहे. हाच मुद्दा पकडून "माज" या चित्रपटाची निर्मिती केली आहे, "माज" सकारात्मक वा नकारात्मक हे गुलदस्त्यातच ठेवले आहे, ते येत्या २ आॅगस्ट रोजी सिनेमागृहात शिरल्यावर कळेल असे चित्रपटाचे निर्माते संदीप टकले यांनी सांगितले.
            या चित्रपटातून एक नवी कोरी जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे, "अमित रेखी व अर्चना संकेत," सोबत नाना गोडबोले, प्रकाश धोत्रे, सशांक दर्णे, मिलिंद जाधव, व्रुंदा बाळ, प्रेम नरसाळे, पूनम कापसे, चंचला बोरकर, जगदीश कुंभार, यासारखे कलाकार आहेत, स्वता निर्माते संदीप टकले यांनीही एक छोटीशी भूमिका साकारली आहे.
           प्रेमगीत व आयटम साँग अशी कथानकाला साजेशी दोन गाणी चित्रपटात आहेत.
          अनुष्का इमॅजिन फिल्मस् प्रस्तुत "माज...फिनिश इट" चित्रपटातील "माज" बघायचे आवाहन नासिक येथे आज प्रमोशनसाठी आलेल्या चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञांनी केले. दर्शन प्राडक्शन्स द्वारे चित्रपट वितरीत करण्यात येणार आहे.
मग चला तर, "हा माज बघूया" , २ आॅगस्ट ला !!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!