योगाला वयोमर्यादा नसल्याने समाजातील प्रत्येक नागरिकाने योग अभ्यास करावा - विश्वासराव मंडलिक !! योग आयुष्यात असणे म्हणजे रोग मुक्त आयुष्य- पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

आरोग्यम धनसंपदा कार्यशाळेतून मधुमेहस्थुलता निरावरणाचे धडे
योगाला वयोमर्यादा नसल्याने समाजातील प्रत्येक नागरिकाने योग अभ्यास करावा - विश्वासराव मंडलिक
नाशिक,दि.७ जुलै :- योगाला वयोमर्यादा नसल्याने समाजातील प्रत्येक नागरिकाने योग अभ्यास करावा त्यात पदवी मिळवावी व आपल्यासोबत इतरांनीही त्याचे मार्गदर्शन करावे असे।आवाहन पंतप्रधान योग पुरस्कार विजेते विश्वास मंडलिक गुरुजी यांनी केले. आज  परशुराम सायखेडकर नाट्यगृह शालिमार येथे योग विद्या धामच्या माध्यमातून आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन केले.
         या कार्यशाळेस पमुख पाहुणे नाशिकचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख मनोहर कानडे,ओंकार नगर (नवीन नाशिक) अध्यक्ष राजेंद्र फड,योगशिक्षिका कांचंनताई खाडे,योगविद्या धामचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम पुरी, अमरजीतसिंग गरेवाल, डॉ. विद्याताई देशपांडे,आशाताई वेळूकर,निलेश वाघ, योग शिक्षक व साधक उपस्थित होते.याप्रसंगी किशोर वयीन मुलांसाठी योग व मसाज तंत्र व मंत्र या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
           यावेळी विश्वासराव मंडलिक म्हणाले की, आहारातील बदलामुळे मधुमेह आणि स्थूलतेचे प्रमाण अधिक वाढले असून मधुमेह व स्थूलता निवारणासाठी नियमित योग करण्याची आवश्यकता आहे. योग अभ्यास करण्यासाठी कुठलीही वयाची मर्यादा नसल्याने निरोगी आयुष्यासाठी सर्वांनी योगाचे धडे घेऊन इतरांना मार्गदर्शन करावे असे आवाहन केले. किशोर वयात येताना मुलांमध्ये वेगवेगळे बदल होत असतात त्या काळात त्यांची मानसिक स्थिती चांगली राहावी यासाठी योग अभ्यास महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
           या प्रसंगी लक्ष्मीकांत पाटील म्हणाले की, सर्व सामान्यांसाठी योग प्रशिक्षणाची सुविधा योग विद्या धामने उपलब्ध करून दिली आहे. यावेळी निरोगी आरोग्यासाठी योग उपचार संकल्पनेवर आयोजित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले.पोलिस दलासाठी योग प्रशिक्षण सुरू करण्याचा मनोदय व्यक्त करत. योग आयुष्यात असणे म्हणजे रोग मुक्त आयुष्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समाजात योग साधक म्ह्णून देखील काम करण्यास आपल्याला आवडेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
             यावेळी योग शिक्षकांनी योग आसने, प्राणायाम प्रात्यक्षिके व शुद्दी क्रिया व्यासपीठावर दाखविण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगशिक्षिका सुवर्ण गौरी चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन ओंकारनगर नवीन नाशिकचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी केले. नाशिक शहर परिसरात मुसळधार पाऊस असतांना कार्यशाळेस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
         योग विद्याधाम गुरुकुल तळवाडे येथे साकारण्यात येत असलेल्या साधना मंदिरासाठी कुलगुरू योगाचार्य विश्वासराव मंडलिक यांनी पंतप्रधान पुरस्कारातून प्राप्त झालेली २५ लक्ष रुपयांची मदत संस्थेला सुपूर्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक