दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई होणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवेदन ! न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

पावसाने नाशिक महानगरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थे बाबत दोषी अधिकारी व संबंधीत कंत्राटदारांवर कारवाई व्हावी - मनसेचा आयुक्तांना इशारा.

नाशिक : महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांच्या पावसाने झालेल्या दुरावस्थेस दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई होणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे.
      गत तीन-चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाच्या संततधारेने नाशिक महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून रस्त्यांच्या कामाच्या दर्ज्याबाबत समाजातील विविध स्तरांवरून अनेक तक्रारी येत आहेत. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते व तत्सम कामांसाठी असलेल्या व महानगरपालिकांसाठी बंधनकारक असलेल्या नियमावली प्रमाणे रस्ते बनविणाऱ्या कंत्राटदारांनी ठराविक मुदती करीता (DLP) संबंधीत रस्त्यांची देखरेख ठेवणे बंधनकारक आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या व ठेकेदारांच्या संगनमतामुळे दरवर्षी पावसाळा संपल्यावर रस्ते दुरुस्तीच्या कामांची नव्याने निविदा काढून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकाळा दरम्यान  राज ठाकरे यांनी रस्त्यांच्या कामाच्या दर्ज्याबाबत ठेकेदारांना सक्त निर्देश दिले होते. मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत योग्य ते निर्देश पाळले जात नसून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयुक्तांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने रस्ते दुरुस्ती करून संबंधीत विभागाच्या कामाची खातेनिहाय चौकशी करून थोड्या पावसाने रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेबाबत संबंधीत दोषी कंत्राटदारास कायम स्वरूपी काळ्या यादीत टाकावे तसेच अधिकारी व कंत्राटदारांचे याबाबत संगनमत आढळल्यास नागरिकांच्या कराच्या पैश्याचा भ्रष्टाचार करून अपहार करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर सक्त कारवाई करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारून दोषी अधिकारी व कंत्राटदारांना जाब विचारण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला.   
निवेदन देताना शहराध्यक्ष अंकुश पवार, विभाग अध्यक्ष भाऊसाहेब निमसे, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, राहुल नवले, रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष अभिजित गोसावी, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, कामगार सेना प्रदेश उपचिटणीस प्रकाश बंटी कोरडे, कैलास मोरे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष जावेद शेख, निकीतेश धाकराव, उपशहराध्यक्ष विजय आहिरे, शारीरिक सेना शहराध्यक्ष विजय आगळे, मनविसे शहराध्यक्ष सौरभ सोनवणे, सिद्धेश सानप, अजिंक्य बोडके हे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

जागतिक फार्मासिस्ट दिवस विशेष एसएमबीटी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची ‘अशीही’ सामाजिक बांधिलकी !

विजयादशमीला शिवप्रताप गरूडझेप ! ‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’ !!