समर्पित कार्यकर्ता हेच जनजाती कल्याणकारी उपक्रमांचे बळ -  अतुल जोग. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !! न्यूज मसाला सर्विसेस 7387333801.


समर्पित कार्यकर्ता हेच जनजाती कल्याणकारी उपक्रमांचे बळ -  अतुल
जोग


     नाशिक ( प्रतिनिधी ) जनजाति समाजाला स्वावलंबी स्वाभिमानी आणि संघटित करण्याचे कार्य "वनवासी कल्याण आश्रमाच्या" माध्यमातून संपूर्ण देशभरात होत आहे. समर्पित कार्यकर्ता व त्याच्यातील सातत्य हेच अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या विस्ताराचे बळ व गमक असल्याचे प्रतिपादन कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय संघटन मंत्री अतुल जोग यांनी केले. काल नाशिकमध्ये एका बैठकीसाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी  संवाद साधला.

       पत्रकार परिषदेत बोलतांना अतुल जोग म्हणाले ,संपूर्ण भारतभरातील २०८ जिल्ह्यातील ७७ हजारांपेक्षा अधिक कुटुंबांनी कल्याण आश्रमाच्या विविध सेवा योजनांचा लाभ घेतला आहे, १७० जनजातीपर्यंत आणि २३ अतिमागास जनजातींपर्यंत कल्याण आश्रमाचा सतत संपर्क आहे.आज अखिल भारतीय पातळीवर कल्याण आश्रमाचे तब्बल ४५१० शैक्षणिक प्रकल्प सुरू असून १ लाख ३८

 हजारपेक्षा जास्त लाभार्थी कल्याण आश्रमाच्या विविध सेवाकार्यांचा लाभ घेत आहेत. यात क्रीडा केंद्रे,सांस्कृतिक केंद्रे, स्वमदत गट ग्राम विकास प्रकल्प, आरोग्य शिबिरे, ग्रामीण आरोग्यरक्षक योजना, यासारख्या विविध कार्यांचा समावेश आहे. कोरोना काळातही कल्याण आश्रमाने आपले उत्तरदायित्व अत्यंत चोखपणे बजावून दुर्गम व अतिदुर्गम भागात धान्य, शीधा तसेच बी -बियाणे व खते यांचे वितरण केलेले आहे असे जोग यांनी नमूद केले.

    जनजातीय समाजाच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलताना ते म्हणाले की, केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही जनजातीय समाजाने असामान्य कर्तृत्व दाखवलेले आहे. त्यांच्यातील सुप्त गुणांचा शोध घेत, त्यांचा विकास करण्याचे महत्त्वाचे कार्य कल्याण आश्रम पार पाडीत आहे. शहरी व ग्रामीण क्षेत्रातील हजारो समर्पित कार्यकर्ते हे आपापल्या क्षेत्रात पाय रोवून भक्कमपणे उभे राहिलेले आहेत. त्यांच्याच बळावर वनवासी क्षेत्राच्या प्रत्येक कोपऱ्यात हे कार्य पोहोचू शकेल. प्रत्येक समस्येला तोंड देऊ शकेल असे देशव्यापी संघटन उभारण्यात कल्याण आश्रम यशस्वी ठरलेला आहे असेही त्यांनी सांगितले. या पत्रपरिषदेला आश्रमाचे महाराष्ट्र प्रांत सचिव शरद शेळके उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांचे स्वागत केले व आभार मानले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

आंतर जिल्हा बदलीने जिल्ह्यात शिक्षकांना पदस्थापना ! शून्य शिक्षक शाळांना मिळाले २० शिक्षक !!