बॉक्सर अंजली व श्रीहरी यांचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गौरव ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!


बॉक्सर अंजली व श्रीहरी यांचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते
गौरव !

        नाशिक, दि.२४ जानेवारी :- महाराष्ट्र राज्याचा सन २०२० चा क्रीडारत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज बॉक्सर अंजली मोरे व श्रीहरी मोरे या बंधू व भगिणीचे आज नाशिक येथील कार्यालयात सत्कार करून गौरव करण्यात आला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ तसेच मोरे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
      बॉक्सिंग खेळाडू अंजली मोरे आणि श्रीहरी मोरे हे दोघेही विश्वविख्यात बॉक्सर मेरी कोम यांचेकडे गेल्या पाच वर्षांपासून प्रशिक्षण घेत आहे. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावले आहे. अंजली मोरे हिने आतापर्यंत २७ सुवर्णपदक तर श्रीहरी २५ सुवर्णपदक पटकावले असून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२० सालचा क्रीडारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!