महीलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराबाबत झालेल्या गैरसोय प्रकरणी आज सायंकाळपर्यंत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश !! दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!


नाशिक: त्र्यंबकेश्वर तालुकयातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीरप्रसंगी बेडअभावी महिला रुग्णांची गैरसोय झाल्या प्रकरणी आरोग्य विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले असून आज (दि. २) सायंकाळपर्यत चौकशी अहवाल सादर करुन याप्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत.  त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया झालेल्या स्त्री रुग्णांना दुस-या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रात हलविण्याच्या सुचनाही गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत.
कोरोनामुळे जिल्हयात कुंटुंबनियोजन शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. लॉकडॉऊन शिथील झाल्यानंतर डिसेंबरपासून जिल्हयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांना सुरुवात झाली आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हा नियमित स्वरुपाचा कार्यक्रम असून एप्रिल ते मार्चपर्यत नियमित स्वरुपात याची अंमलबजावणी करण्यात येते. त्र्यंबकेश्वर तालुकयातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येदेखील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ४१ महिलांनी नोंदणी केली होती. प्राथमिक आरोग्य केद्रातील वैद्यकीय अधिका-यांनी बेडच्या उपलब्धतेबाबत रुग्णांना पूर्वकल्पना दिली होती. मात्र बेडअभावी काही स्त्री रुग्णांची गैरसोय झाल्याचे निर्दशनास आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांच्यामार्फत याबाबत चौकशीचे आदेश दिले असून शुक्रवारी (दि.२२) सायंकाळपर्यत चौकशी करुन सबंधितांवर नियमानूसार कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रावर दाखल करण्याच्या सुचना गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।