बालविवाह प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल !!! ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर यांनी दिली फिर्याद !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!


बाल विवाह प्रतिबंधक कायद्यान्वये वणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.

               नासिक::-कोरोना साथरोग लॉकडाऊन काळात करंजवण (दिंडोरी) येथे घराच्या पडवीत बालविवाह संपन्न झाला होता. अल्पवयीन मुलगी आणि तिची आई रा.लखमापुर फाटा, मुळगाव जळगाव यांनी करंजवण येथे एका घराचे पडवीत दि. २ मे २०२० रोजी अल्पवयीन मुलगी हिचे वय १३ वर्ष ३ महिने असताना तिचा बालविवाह घोटी ता. इगतपुरी येथील तरुणाचा चोरून संपन्न झाल्याने करंजवन ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर यांनी दि. २२ जानेवारी २०२१ रोजी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सहा. पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी आरोपी, आरोपीचे आई-वडील, बहीण व अल्पवयीन मुलीची आई यांचे विरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००७ चे कलम ९ , १० , ११ ( १ ), भारतीय दंड संहिता १९६० चे  कलम १८८ , २६९ , २७० , २७१ या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
        सदरचा प्रकार ज्यांच्या घराच्या पडवीत विवाह संपन्न झाला होता ते मयत झाल्याने त्यांच्या विधीसाठी अल्पवयीन मुलगी व मुलाचे स्वकीय करंजवन  येथे २४ नोव्हेंबर २०२० रोजी आले असता, पहाटे गरम पाण्याचा ड्रम सांडल्याने मुलगी व तिची ननंद यांच्या अंगाखाली गरम पाणी जाऊन त्यांच्या पाठीचे भागाला जळून दुखापती झाल्या होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तसेच बाल कल्याण समिती नाशिक यांनी मुलीचे जाब जबाब घेतले असता, मुलीचा बालविवाह झाल्याचा संशय आल्याने सहा. पोलीस उपनिरीक्षक आर व्ही सोनवणे यांनी करंजवन ग्राम विकास अधिकारी अरूण आहेर यांना या प्रकाराची चौकशी करण्यास सांगितले. चौकशीअंती मुलीचा बालविवाह चोरून झाला असे उघड झाल्याने. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याकामी सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रतन पगार सहा. पोलिस उपनिरीक्षक आर व्ही सोनवणे अधिक तपास करीत करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी डांगी भाषेत केलेले आवाहन !!

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी अहीराणी भाषेतून केले आवाहन ! व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

जिल्हा परिषदेत ५८ कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने पदोन्नत्या ! कुटुंबप्रमुखच्या भूमिकेत मुख्य कार्यकारी अधिकारी !!