विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ साहेब यांचा महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटनेकडून सत्कार व विविध विषयांवर चर्चा ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!


विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ साहेब यांचा महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटनेकडून सत्कार व विविध विषयांवर चर्चा !

भागवत गायकवाड सुरगाणा यांजकडून,
न्यूज मसाला सर्विसेस,

     नासिक (२)::- वनारे  ता. दिंडोरी येथे विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ  यांची महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटना  सदस्यांनी भेट घेतली.  मंत्रालयातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी  केलेल्या मंत्रालयातील सहकार्याबद्दल त्यांचा भागवत धूम यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामविकास सचिव यांच्याशी चर्चा करून एक प्रसिद्धी पत्रक लागू करावे जेणेकरून आदिवासी भागातील सर्व कर्मचारी बांधवाना एकस्तर योजनेचा लाभ मिळेल. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांनी जुनी पेन्शन योजनेसाठी मागील काही दिवसांपूर्वी राज्याध्यक्ष नितेश खांडेकर यांची जिल्हा सल्लागार भागवत धुम यांनी  घडवून आणलेली भेट व त्यानंतर झालेली चर्चा याविषयी आज झिरवाळ यांनी सांगितले की आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे "जुनी पेन्शन योजना, मी अजित पवार यांना याविषयी बोललो आहे, लवकरच आपण त्यांच्याबरोबर वरील विषयावर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करणार आहोत".  शिक्षणसेवक मानधन वाढ यासंबंधी  मंत्रालयात चर्चा करून मानधन वाढीबद्दल पाठपुरावा करावा, शिक्षणसेवक बांधवांचा आर्थिक प्रश्न मार्गी लागेल. अप्रशिक्षित शिक्षणसेवक (१२वी) यांची सेवा रुजू तारखेपासून  चट्टोपाध्याय वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरण्यात यावी, यासाठीही चर्चा झाली व त्याबाबत निवेदन देण्यात आले.
    ना. झिरवाळ पुढे म्हणाले की, वरील सर्व विषय मला निवेदनाद्वारे मिळाले आहेत, मी याचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करतो असे आश्वासन दिले, मंत्रालायमध्ये चर्चा करण्यासाठी बोलवले तर आपण आपले प्रतिनिधी यांनी मंत्रालयात हजर राहावे.
  यावेळी महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटना सभासद  बांधव सुरगाणा, दिंडोरी, कळवण, पेठ, इगतपुरी, त्रंबकेश्वर येथील बांधव वनारे ता. दिंडोरी येथे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

जागतिक फार्मासिस्ट दिवस विशेष एसएमबीटी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची ‘अशीही’ सामाजिक बांधिलकी !

विजयादशमीला शिवप्रताप गरूडझेप ! ‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’ !!