" अल्फ़ाज़ो की उड़ान " प्रातिनिधिक कथासंग्रहाचे लवकरच प्रकाशन! नागेश शेवाळकर यांच्या दोन कथांचा समावेश! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


" अल्फ़ाज़ो की
उड़ान " प्रातिनिधिक कथासंग्रहाचे लवकरच प्रकाशन!
नागेश शेवाळकर यांच्या दोन कथांचा समावेश!!

       पुणे (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रातील ख्यातकीर्त लेखक नागेश सू. शेवाळकर यांच्या दोन हिंदी कथांचा समावेश असणारा 'अल्फ़ाज़ो की उड़ान' हा कथासंग्रह २६ जुलै २०२१ रोजी उज्जैन (मध्यप्रदेश) येथे प्रकाशित होत आहे. जतिन गहलोत प्रकाशक यांनी श्रीहिन्द पब्लिकेशनव्दारे हा प्रातिनिधिक हिंदी कथासंग्रह प्रकाशनार्थ सज्ज केला आहे.
         महाराष्ट्रातील नामवंत लेखक नागेश सू. शेवाळकर यांनी लिहिलेल्या 'चाय पुराण' आणि 'डर कोरोना का' या दोन हिंदी विनोदी कथांचा ह्या कथासंग्रहात समावेश करण्यात आला आहे. मराठी भाषेत लेखन करणाऱ्या शेवाळकरांनी हिंदी भाषेत लेखनाचा असा शुभारंभ केला असून या यशाबद्दल नागेश शेवाळकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. हा कथासंग्रह, अमेझॉन, किंडले अशा संस्थांवर विक्रीसाठी उपलब्ध असेल असे जतिन गहलोत यांनी कळवले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते, बियाणे व किटकनाशके पुरवावी- सुनिल बोरकर, गुण नियंत्रण संचालक, कृषी आयुक्तालय.

उल्लेखनीय::- सगळीकडे उन्हाची तीव्रता जाणवत असतानाही तालुक्यात आजपर्यंत एकही टँकर चालू नाही, तालुक्यात कुठल्याही ग्रामपंचायतचा पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी प्रस्ताव आलेला नाही.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !