समस्या मांडण्यासाठी विद्यार्थ्यांनी पोर्टलचा सकारात्मकतेने वापर करणे आवश्यक -- कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन
समस्या मांडण्यासाठी विद्यार्थ्यांनी पोर्टलचा सकारात्मकतेने वापर करणे आवश्यक - कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन
नाशिक: - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या जलद आणि पारदर्शक पद्धतीने विद्यापीठापर्यंत पोहोचण्यासाठी पोर्टल सारख्या माध्यमाची गरज असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मा. व्यवस्थापन परिषद बैठकीत विद्यापीठातर्फे ऑनलाइन विद्यार्थी तक्रार निवारण पोर्टलचा शुभारंभ कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांच्या हस्ते करण्यात आला. या बैठकीस अध्यक्षस्थानी डॉ. गिते यांच्या समवेत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सचिन मुंबरे, डॉ. विलास वांगीकर, डॉ. मिलिंद आवारे, डॉ. विठ्ठल धडके, डॉ. राजकुमार पाटील, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बी. जे. सोनकांबळे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. देवेंद्र पाटील, अधिष्ठाता डॉ. किरण पाटोळे उपस्थित होते.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी थेट विद्यापीठापर्यंत पोहोचविण्यासाठी ऑनलाईन पोर्टल (SGRC) उपलब्ध करुन देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अडचणी मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळाले आहे. प्राप्त तक्रारींच्या निवारणासाठी स्वतंत्र कक्षामार्फत कार्यवाही करण्यात येईल. संलग्तिन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना समस्या मांडण्यासाठी विद्यापीठाकडून सुलभ आणि पारदर्शक माध्यम उपलब्ध झाले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन कार्यपध्दतीत अधित सुलभता येण्यासाठी विद्यापीठाकडून लवकरच ’व्ही.सी. पोर्टल’ सुरू करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, संघभावना, सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक प्रसन्नता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून विद्यापीठातर्फे ’कुलगुरू चषक’ क्रीडा विषयक उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. या उपक्रमास विद्यापीठाच्या मा. व्यवस्थापन परिषदेने मंजुरी प्रदान केली आहे. या उपक्रमाव्दारे विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना चालना मिळणार आहे. विद्यापीठाच्या ’कुलगुरू चषक’अंतर्गत राज्यातील विविध महसुली विभागांमध्ये आंतरमहाविद्यालयीन विभागीय आणि आंतरविभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून अंतिम नाशिक येथे होईल. शैक्षणिक उपक्रमांबरोबरच त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यालाही समान महत्त्व देणे गरजेचे असल्याने विद्यार्थ्यांसाठी ’कुलगुरू चषक’ उपक्रम महत्वपूर्ण ठरेल असे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कुलगुरु महोदय यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेले पोर्टलमुळे विद्यार्थी व विद्यापीठ प्रशासन यांच्यात संवादात अधिक पारदर्शकता वाढेल. कुलगुरु चषकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात भरारी घेण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठातर्फे सुरु करण्यात आलेले ऑनलाइन विद्यार्थी तक्रार निवारण पोर्टल www.muhs.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याबाबत सर्व संलिग्नित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना माहिती द्यावी असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या मा. व्यवस्थापन परिषद बैठकीस विद्यापीठाचे विविध अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा