महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची विद्यार्थी परिषद निवडणूक संपन्न

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची विद्यार्थी परिषद निवडणूक संपन्न

        नाशिक: - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विद्यार्थी परिषद निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवर विजयी पदाधिकाऱ्यांचे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्यंकट गिते, निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील यांनी अभिनंदन केले.
      यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांनी विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवरील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना विद्यापीठातर्फे शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक समस्या प्रतिनधींमार्फत विद्यापीठाकडे दिल्यास त्याची तत्परतेने कार्यवाही करण्यात येईल. संशोधन, विविध विद्यार्थी कल्याणकारी योजना, शिष्यवृत्ती, क्रीडा व सांस्कृतिक आदींकरीता विद्यार्थ्यांकरीता काम करण्यात येईल. आरोग्य विषयक सामाजिक जनजागृतीकरीता आपले सहकार्य महत्वाचे आहे त्यासाठी विद्यापीठाच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा. विद्यापीठ प्रशासन व विद्यार्थी यांच्यात योग्य समन्वय रहावा यासाठी विद्यार्थी प्रतिनिधींची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
      याबाबत निवडणुक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998 कलम 23(2)(टी) नुसार विद्यापीठाच्या अधिसभेवर तीन विद्यार्थी प्रतिनिधी निवडून देण्याची तरतूद आहे. त्यानुसार निवडणूक प्रक्रियेव्दारे हिंगोली येथील डॉ. हेडगेवार स्मृती सेवा मंडळाचे दंत महाविद्यालयातील जायभावे आदित्य रामकिसन, मिरज येथील गुलाबराव पाटील होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयातील मोकाशे लक्ष्मीकांत होनकालस व नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मनगटे शुभंकर नितीन या तीन सदस्यांची विद्यापीठाच्या अधिसभेवर निवड झालेली आहे.  
           महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998 अन्वये विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवर एक अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, एक सचिव आणि दोन सहसचिव निवडून देण्याची तरतूद आहे. यानुसार विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी नंदुरबार येथील के.डी. गावीत कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाचा माळी रोहित मधुकर यांची बिनविरोध निवड झाली आहे तसेच उपाध्यक्षपदी पुणे येथील एम.ए.आर.आर.ई. कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा काकड यशराज धनंजय आणि नागपूर येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचा माहोरे मिथीलेश श्रीकृष्णा यांची निवड झाली आहे. सचिव पदाकरीता नाशिक येथील आर.जे.एस. होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाचा आंधळे ज्ञानेश्वर रावसाहेब यांची बिनविरोध निवड झाली आहे तसेच सहसचिव पदाकरीता येवला येथील एस.एन.डी. कॉलेज ऑफ नर्सिंगचा पाटील केशव शरद आणि नागपूर येथील एस.डी. काळमेघ एस. दंत महाविद्यालयाची भुराने देवांशी प्रशांत यांची निवड झाली आहे.
       विद्यापीठ परिषद निवडणूकीकरीता उपस्थित सदस्यांना उपकुलसचिव महेंद्र कोठावदे यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती दिली. निवडणूक प्रक्रियेनंतर त्वरीत मतमोजणी करुन विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी नवनिर्वाचित नावांची घोषणा केली.
सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडणेसाठी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र बंगाळ, मतमोजणी तज्ज्ञ म्हणून विशेष कार्य अधिकारी फुलचंद अग्रवाल, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील, उपकुलसचिव महेंद्र कोठावदे, विधी अधिकारी ॲड. संदीप कुलकर्णी, प्रकाश पाटील, सहायक कुलसचिव मिलिंद देशमुख उपस्थित होते. या निवडणुक प्रक्रियेकरीता विद्यापीठ अधिसभा व विद्यार्थी परिषदेवरील नवनिर्वाचित सदस्यांचे विद्यापीठ परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकच्या जडणघडणीत मविप्रचा मोलाचा वाटा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिमाखात उद्घाटन

ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेडच्या आयपीओला उत्तम प्रतिसाद - आयपीओच्या पहिल्याच दिवशी २.१ पट प्रतिसाद. इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड चा आयपीओ २८ ऑगस्ट २०२६ रोजी उघडला, प्रति इक्विटी शेअर किंमत पट्टा (Price Band) ₹४०८ ते ₹४२९ निश्चित (दर्शनी मूल्य ₹१ प्रति शेअर). • प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा ₹४०८– ₹४२९ निश्चित. •बोली/इश्यू उघडण्याची तारीख – २८ ऑगस्ट २०२६ आणि बोली/इश्यू बंद होण्याची तारीख – १ सप्टेंबर २०२६. • किमान बोली लॉट ३४ इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर ३४ इक्विटी शेअर्सच्या पटीत

सिडकोतील महिलांनी हेमंत गोडसे यांचे औक्षण करून दिल्या विजयीभव च्या शुभेच्छा !! तरुणांनी काढलेली मोटारसायकल रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!