ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेडच्या आयपीओला उत्तम प्रतिसाद - आयपीओच्या पहिल्याच दिवशी २.१ पट प्रतिसाद. इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड चा आयपीओ २८ ऑगस्ट २०२६ रोजी उघडला, प्रति इक्विटी शेअर किंमत पट्टा (Price Band) ₹४०८ ते ₹४२९ निश्चित (दर्शनी मूल्य ₹१ प्रति शेअर). • प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा ₹४०८– ₹४२९ निश्चित. •बोली/इश्यू उघडण्याची तारीख – २८ ऑगस्ट २०२६ आणि बोली/इश्यू बंद होण्याची तारीख – १ सप्टेंबर २०२६. • किमान बोली लॉट ३४ इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर ३४ इक्विटी शेअर्सच्या पटीत

ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेडच्या आयपीओला उत्तम प्रतिसाद - आयपीओच्या पहिल्याच दिवशी २.१ पट प्रतिसाद
इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड चा आयपीओ २८ ऑगस्ट २०२६ रोजी उघडला , 
प्रति इक्विटी शेअर किंमत पट्टा (Price Band) ₹४०८ ते ₹४२९ निश्चित (दर्शनी मूल्य ₹१ प्रति शेअर)

• प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा ₹४०८– ₹४२९ निश्चित

• बोली/इश्यू उघडण्याची तारीख – २८ ऑगस्ट २०२६ आणि बोली/इश्यू बंद होण्याची तारीख – १ सप्टेंबर २०२६

• किमान बोली लॉट ३४ इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर ३४ इक्विटी शेअर्सच्या पटीत

      नाशिक: इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड कंपनीने तिच्या इनिशियल पब्लिक ऑफरसाठी (आयपीओ) ₹१ दर्शनी मूल्य असलेल्या प्रति इक्विटी शेअरचा किंमतपट्टा ₹४०८ ते ₹४२९ निश्चित केला आहे. कंपनीचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपी" किंवा इश्यू) सबस्क्रिप्शनसाठी २८ ऑगस्ट २०२६ रोजी उघडून १ सप्टेंबर २०२६ रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान ३४ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ३४ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात. इश्यू-पूर्व उर्वरित ₹१ दर्शनी मूल्याचे १००,४२७,७५३ इक्विटी शेअर्स आऊटस्टॅडिंग आहेत. हा आयपीओ ₹७,२००.०० दशलक्ष पर्यंतचा ताजा इश्यू (Fresh Issue) आहे.
             ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावाला (आयपीओ) बोलीच्या पहिल्याच दिवशी २.१ पट प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे या आयपीओसाठी किरकोळ (रिटेल) आणि गैर-संस्थात्मक (नॉन-इन्स्टिट्यूशनल) गुंतवणूकदारांकडून असलेली जोरदार मागणी दिसून आली. शेअर बाजारांवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, देऊ केलेल्या १,२३,५२,९४२ इक्विटी शेअर्सच्या तुलनेत या इश्यूला २,५९,७७,९७२ इक्विटी शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली. किरकोळ (रिटेल) भाग आणि गैर-संस्थात्मक भाग अनुक्रमे २.६९ पट आणि ३.५१ पट प्रतिसाद मिळवून सबस्क्राईब झाले. पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIB) ०.०१ पट सबस्क्राईब झाले. या इश्यूची वर्गणी शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू झाली असून, मंगळवार, ०१ सप्टेंबर २०२६ रोजी बंद होईल. इश्यू सुरू होण्याच्या एक दिवस आधी, ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेडने अँकर गुंतवणूकदारांकडून जवळपास २१६ कोटी रुपये उभारले.
        २००५ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी भारतातील एआय-सक्षम क्लाउड, मॅनेज्ड सर्व्हिसेस, डेटा सेंटर पायाभूत सुविधा आणि सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रदाता आहे. भारतातील GPUaaS, क्लाउड, मॅनेज्ड सर्व्हिसेस, डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर आणि सॉफ्टवेअर सोल्यूशन्सचे संपूर्ण स्पेक्ट्रम प्रदान करणाऱ्या केवळ दोन कंपन्यांपैकी ही एक आहे (स्रोत: नेक्सडिजम रिपोर्ट, पृष्ठ ६६). शिवाय, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ₹४,७२२.१०4, दशलक्ष ऑपरेशन्समधील महसुलासह ही कंपनी दोन्हीपैकी सर्वात मोठी आहे (स्रोत: नेक्सडिजम रिपोर्ट, पृष्ठ ७७).
            कंपनी क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर आणि सॉफ्टवेअर सोल्यूशन्सचा एक सर्वसमावेशक प्लॅटफॉर्म प्रदान करते, ज्यामध्ये (i) इन्फ्रास्ट्रक्चर एज अ सर्व्हिस (IaaS), जे मुख्यत्वे कोलोकेशन आणि डेटा सेंटर सर्व्हिसेस, क्लाउड सर्व्हिसेस आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये विभागलेले आहे, (ii) मॅनेज्ड सर्व्हिसेस आणि (iii) सॉफ्टवेअर एज अ सर्व्हिस (SaaS) समाविष्ट आहे. यामुळे ग्राहकांना सुरक्षितता, लवचिकता आणि विश्वासार्हता प्रदान करताना त्यांचा खर्च कमी करणे शक्य होते.
                      समान व्यवसाय मॉडेल आणि डेटा प्रायव्हसी, सुरक्षितता, अनुपालन व नियामक गरजा असलेल्या संस्थांच्या गटासाठी मल्टी-टेनंट मॉडेलवर कम्युनिटी क्लाउड सर्व्हिसेस ऑफर करणाऱ्या भारतातील पहिल्या क्लाउड सेवा प्रदात्यांपैकी ही एक आहे (स्रोत: नेक्सडिजम रिपोर्ट, पृष्ठ ३०).
           कंपनी विविध क्षेत्रांतील ग्राहकांना सेवा प्रदान करते, ज्यामध्ये (i) बँकिंग, आर्थिक सेवा आणि विमा कंपन्या, (ii) सार्वजनिक क्षेत्रातील संस्था (केंद्रीय, राज्य आणि स्थानिक सरकारी विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सरकारी एजन्सी आणि संस्था) आणि (iii) विविध व्यवसाय व एंटरप्रायझेस यांचा समावेश आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये २,५०१ ग्राहकांना सेवा दिली.
          ३१ मार्च २०२६ रोजी, कंपनीने ऑस्ट्रेलियास्थित 'नियॉक्लाउड एआय कॉम्प्युट सर्व्हिस प्रदाता' सोबत एक धोरणात्मक एआय क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर करार केला. हा करार सुरुवातीच्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी आहे, ज्यामध्ये पुढील दोन वर्षांसाठी मुदत वाढवण्याचा पर्याय आहे. एकूण कराराचे मूल्य सुमारे $१,२५० दशलक्ष अमेरिकन डॉलर (३१ मार्च २०२६ रोजीच्या १ USD = ₹९४.६५ या विनिमय दरानुसार ₹११८,३१२.५० दशलक्ष सममूल्य) आहे (स्रोत: www.rbi.org.in).
           या करारानुसार, एआय कंपनीला ऑस्ट्रेलियातील विद्यमान डेटा सेंटर सुविधा मधील समर्पित एआय इन्फ्रास्ट्रक्चर क्लस्टर तैनात करणे आणि ऑपरेट करणे आवश्यक आहे. या क्लस्टरमध्ये संबंधित स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चरसह सुमारे ८,२०८ NVIDIA B300 GPUs समाविष्ट असतील. अशा पायाभूत सुविधांचे वितरण सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे आणि करारांतर्गत महसूल निर्मिती आर्थिक वर्ष २०२७ च्या तिसऱ्या तिमाहीत सुरू होण्याची अपेक्षा आहे.
           या करारात मासिक आधारावर सेवा शुल्क देण्याची तरतूद आहे. या भागीदारीचा उद्देश कंपनीच्या क्लाउड आणि मॅनेज्ड सर्व्हिसेसच्या ऑफरला पाठिंबा देण्यासाठी हाय-परफॉर्मन्स एआय कॉम्प्युट क्षमतेचा वापर मजबूत करणे हा आहे.
           कंपनीला इकॉनॉमिक टाइम्स अचिव्हर्स (कर्नाटक) द्वारे "मोस्ट प्रिफर्ड अँड ट्रस्टेड क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर" म्हणून ओळखले गेले आहे आणि २०२२ मध्ये "कॉम्बॅट कोविड १९ विथ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स" श्रेणीमध्ये एजिस ग्रॅहॅम बेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
        आर्थिक वर्ष २०२४ मधील ₹२,८६५.१८ दशलक्षच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल ₹४,७२२.१० दशलक्ष होता.
          कंपनीचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष २०२४ मधील ₹१३६.०९ दशलक्ष वरून वाढून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ₹१,२०८.२३ दशलक्ष झाला.
          डीएएम कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड (DAM Capital Advisors Limited) आणि सिस्टीमॅटिक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड (Systematix Corporate Services Limited) हे या इश्यूसाठी बुक-रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. MUFG Intime India Private Limited ही या इश्यूसाठी रजिस्ट्रार आहे.
        हे इक्विटी शेअर्स एनएसई आणि बीएसईवर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकच्या जडणघडणीत मविप्रचा मोलाचा वाटा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिमाखात उद्घाटन

कौशल्याचे प्रशिक्षण घेऊन महिलांनी स्वावलंबी व्हावे – हेमलता बिडकर

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी डांगी भाषेत केलेले आवाहन !!