शेल्टर २०२६ स्टॉल लकी ड्रॉ उत्साहात संपन्न, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि रेडिओ प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग !

शेल्टर २०२६ स्टॉल लकी ड्रॉ उत्साहात संपन्न,
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि रेडिओ प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग !

नाशिक::- क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे १७ ते २१ डिसेंबर दरम्यान शहरातील डोंगरे वसतिगृह येथे आयोजित बहुप्रतीक्षित ‘शेल्टर २०२६’ या द्वैवार्षिक भव्य मालमत्ता प्रदर्शनातील स्टॉल वाटपासाठीची सोडत (लकी ड्रॉ) फोर पॉइंट्स बाय शेरेटन हॉटेल, नाशिक येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.
    
          या कार्यक्रमात उपस्थित सदस्यांसमोर सर्वप्रथम शेल्टर २०२६ च्या पूर्वपीठिकेच्या स्वरूपात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘अनस्टॉपेबल नाशिक’ या विशेष उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर शेल्टर २०२६ च्या प्रसिद्धी व प्रसार माध्यमांच्या नियोजनाची तसेच प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांच्या नोंदणी प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली. क्रेडाई नाशिक मेट्रोचे समिती सदस्य निशित अटल यांनी या दोन्ही उपक्रमांची संकल्पना, उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये यांची सविस्तर माहिती उपस्थित सदस्यांना दिली.
          यावेळी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी उपस्थित सदस्यांना संबोधित करताना शेल्टर २०२६ च्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिक, विकासक आणि मालमत्ता खरेदीदारांना उपलब्ध होणाऱ्या विविध संधींवर प्रकाश टाकला. या प्रदर्शनामुळे सदस्यांना आपल्या प्रकल्पांचे प्रभावी सादरीकरण करण्याची, आपल्या व्यवसायाची ओळख अधिक व्यापक करण्याची आणि संभाव्य ग्राहकांपर्यंत थेट पोहोचण्याची मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
 

             यानंतर ट्रीट हॉटेल, नाशिक येथे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि रेडिओ पार्टनर्सची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला सुमारे ७० नामांकित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तसेच ८ प्रमुख रेडिओ केंद्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थितांना ‘अनस्टॉपेबल नाशिक’ आणि ‘शेल्टर २०२६’ या दोन्ही उपक्रमांची संकल्पना, उद्दिष्टे, वैशिष्ट्ये आणि आयोजनाची रूपरेषा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
          नाशिक शहराची क्षमता, विकासाच्या संधी आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने असलेले महत्त्व व्यापक स्तरावर पोहोचविणे, तसेच शेल्टर २०२६ या मालमत्ता प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी, हा या दोन्ही उपक्रमांमागील प्रमुख उद्देश आहे. यासाठी समाजमाध्यमे आणि रेडिओ या प्रभावी माध्यमांचा उपयोग करून व्यापक जनजागृती व प्रचार करण्याबाबत उपस्थित प्रतिनिधींशी विचारविनिमय करण्यात आला.
         ‘अनस्टॉपेबल नाशिक’ हा विशेष पूर्वपीठिका कार्यक्रम १२ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. तर ‘शेल्टर २०२६’ हे क्रेडाई नाशिक मेट्रोचे बारावे द्वैवार्षिक मालमत्ता प्रदर्शन १७ ते २१ डिसेंबर २०२६ या कालावधीत डोंगरे वसतिगृह मैदान, गंगापूर रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात येणार आहे.
             या दोन्ही उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे सदस्य, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रेडिओ पार्टनर्स यांचा सक्रिय सहभाग व सहकार्य महत्त्वपूर्ण ठरणार असून, या माध्यमातून नाशिकच्या विकासाची आणि गुंतवणुकीच्या संधींची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा संस्थेचा मानस आहे.
अध्यक्ष गौरव ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली आय.पी.पी. कृणाल पाटील, संयोजक मनोज खिवसरा, मानद सचिव तुषार संकलेचा, कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा, उपाध्यक्ष अनिल आहेर, अंजन भालोदिया, उदय घुगे तसेच सह-सचिव सचिन बागड, नरेंद्र कुलकर्णी, ऋषिकेश कोते, हंसराज देशमुख तसेच समिती सदस्य श्यामकुमार साबळे, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, सागर शाह, निशित अटल, सुशील बागड, निरंजन शाह, वृषाली हिरे, दिपाली बिरारी, सहयोगी सदस्य सतीश मोरे, सुशांत गांगुर्डे, अभिषेक महाजन, समीर सोनवणे आमंत्रित सदस्य मनोज लाडानी हर्षल हणमंते, भूषण कोठावदे, शिवम पटेल, हिरेन भडजा, मयुरेश चौधरी, ऋषभ जैन, क्रेडाई युवा विंग समन्वयक आदित्य भातंबरेकर, सहसमन्वयक अजिंक्य नहार यांच्या परिश्रमामुळे हा भव्य कार्यक्रम यशस्वी झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेतकऱ्यांना मर्यादित अनुदानावर ट्रॅक्टर, रोटॅव्हेटर, कडबाकुट्टी यंत्र व विद्युत पंपसंच या साहित्याचा लाभ देण्यासाठी योजना.

मधुकर वाडू संशोधक कलावंत; अभ्यासू साहित्यिक. यशोगाथेचा परीपाठ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात- पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश. ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन करा