हेमंत गोडसे यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ--मा.आमदार काशिनाथ मेंगाळ, नगराध्यक्ष लोहगावकर यांनी केला विश्र्वास व्यक्त ! त्र्यंबक तालुका गोडसेंच्या पाठीशी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

त्र्यंबकेश्वर तालुक्याची ताकद गोडसेंच्या पाठिशी
नाशिक- नाशिक लोकसभा मतदार संघातील गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले निष्कलंक, सुसंस्कारी, मितभाषी व विकास कामे करणारे सक्रिय खासदार म्हणून हेमंत गोडसे यांचा लौकिक आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर शहर व तालुक्यातून त्यांच्याच नावाला पसंती मिळत असल्याने त्यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा विश्वास माजी आमदार काशिनाथ मेंगाळ व त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी व्यक्त केला. तालुक्यातील हरसूल, वाघेरा व ठाणापाडा या जिल्हा परिषद गटात शुक्रवारी झालेल्या प्रचार दौऱ्याप्रसंगी ठिकठिकाणी झालेल्या सभेत ते बोलत होते.
    त्र्यंबकेश्वर तालुक्यातील  हरसूल, वाघेरा व ठाणापाडा या तीन जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये झालेल्या प्रचार सभांमध्ये उभय नेते बोलत होते. मेंगाळ व लोहगावकर यांनी नाशिक शहरासह सिन्नर, इगतपुरी तालुक्यांमध्ये गोडसे यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडूण देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर तालुकाही या कामासाठी मागे रहायला नको म्हणून आपणही गोडसे यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडूण देऊ असे प्रतिपादन मेंगाळ व लोहगावकर यांनी केले. 
तालुक्यात उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासह शिवसेना, भाजप, रिपाई, रासप व शिवसंग्राम महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठिकठिकाणी प्रचार रॅली, चौक सभा, मतदारांच्या गाठीभेटी घेऊन कार्यकर्त्यांनी गोडसे यांच्या प्रचाराचा मोर्चा तरुणांनी सांभाळला. तसेच स्वतः गोडसे यांनी ज्येष्ठ नागरीक, तरुण कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेला मतदान करण्याची विनंती केली. या प्रसंगी समाधान बोडके, रवींद्र वारुंगसे, नितीन वानखेडे, भूषण आडसरे, त्र्यंबक दुर्वे, जयराम भुसारे, लक्ष्मण जाधव, सुनील साबळे, अशोक कुंभार, नितीन राऊत आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Comments

Popular posts from this blog

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नतीने पदस्थापना ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!