शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे नाशिकचे उद्योगहद्दपार होण्याच्या मार्गावर- समीर भुजबळ,,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे नाशिकचे उद्योग

हद्दपार होण्याच्या मार्गावर- समीर भुजबळ
                  नाशिक,दि.१४ एप्रिल :-नाशिकच्या सर्वांगीन विकासासाठीउद्योगांचा विकास होणे अपेक्षित होते.उद्योगांबाबत शासनाची असलेली चुकीची धोरणे यासाठी कारणीभूत ठरली. त्यामुळे नाशिकमधील अनेक उद्योग बंद पडत असून अनेक उद्योग हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे नाशिकमध्ये बेरोजगारीचाप्रश्न अधिक गंभीर झाला असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार समीर भुजबळ यांनी दिली. ते इन्स्टिट्यूशनऑफ इंजिनिअर्स यांच्याकडूनआयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, आयमा अध्यक्ष वरुण तलवार,महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्षसंतोष मंडलेच्या, सागर वझरे,यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
                 यावेळी नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग वाढ वविकासाठी आपले काय व्हिजन आहे याबाबत बोलतांना आपली भूमिकासमीर भुजबळ यांनी उद्योजकांसमोरमांडली. यावेळी नाशिकमध्ये असणारेउद्योग व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असणारा नाशिकचाविकास, रोजगार यावर प्रकर्षाने चर्चाकरण्यात आली. याशिवाय विदर्भ मराठवाडयाला मिळणारा विजेचा दर आणि  नाशिकला वेगळा दर मिळत असल्याने येथील उद्योजकां इतरांशी स्पर्धा करतांना अडचणी निर्माण होत असून परिणामी अनेक उद्योग स्थलांतरित  करावे लागत असल्याचीखंतही उद्योजकांनी व्यक्त केली.तसेच नाशिकच्या आर्थिक विकासाला जीएसटीमुळे खीळ बसली आहे. महाग झालेल्या सेवा यांचा उत्पादन खर्चावर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे नाशिकच्या उद्योग वाढीसाठी दिल्लीत खंबीरपणे आवाज उठविणारे नेतृत्व गरज असल्याची भावना उद्योजकांनी व्यक्त केल्या.
            या बैठकीच्या माध्यामतून प्रतिनिधी आणि उद्योजक यांच्या मुक्त संवाद घडवून आणणे हाच मुख्य उद्देश असल्याने सागर वझरे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड युके कडून उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर सन्मानित !

अनंत कान्हेरे मैदान विकसित तरी समस्या कायम ! आयुक्तांना निवेदन !

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !