महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेचा समीर भुजबळ यांना पाठींबा जाहीर ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!


महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेचा समीर भुजबळ यांना पाठींबा जाहीर

 

नाशिक,दि.१४ एप्रिल :-गेल्या पाचवर्षात नाशिकचा खुंटलेला विकास, वाढती बेरोजगारी, नाशिक मधील उद्योग धंद्यांचे स्थलांतर, ते थांबविण्यासाठी होत नसलेले प्रयत्न तसेच चुकीच्या धोरणांमुळे नाशिकवर होत असलेल्या अन्यायाबाबत जनता त्रस्त झाली असून नाशिकला पुन्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी महाराष्ट्र बेलदार भटका समाजाने राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना पाठींबा जाहीर केला आहे. याबाबत त्यांनी समीर भुजबळ यांची भेट घेऊन आपला पाठींबा जाहीर केला आहे.
               समीर भुजबळ यांना दिलेल्या पाठींबा पत्रात म्हटले आहे की, नाशिक लोकसभा मतदार संघाला अभ्यासू आणि व्हिजन असलेल्या नेतृत्वाची गरज असून आघाडी सरकारच्या काळात भविष्याचा विचार करून समीर भुजबळ यांनी केलेल्या कामांनंतर गेल्या पाचार वर्षात नाशिकचा विकास पूर्णपणे रखडलेला आहे. त्यामुळे पुन्हा नाशिकला प्रगतीपथावर नेण्यास्ठी समीर भुजबळ यांच्यासारखा अभ्यासू आणि तळागाळातील जनतेची जान असलेला कर्तव्यनिष्ठ उमेदवार आहे. तसेच मतदार संघातील सर्व समस्यांची जान असलेल्या उमेदवाराला लोकसभेत पाठवणे आवश्यक असल्याने  समीर भुजबळ यांना पाठींबा देऊन संपूर्ण संघटना मतदार संघात प्रचार प्रसाराचे कार्य असल्याचे महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेकडून दिलेल्या पाठींबा पत्रात म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा. पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

महिला शिक्षणाधिकारी व लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

पोलिस शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !