नासिक जिल्ह्यातून नांदेड येथील अधिवेशनास ३५० जणांची उपस्थिती राहणार !!!-- जिल्हाध्यक्ष पवार यांची माहिती,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नांदेड येथील अधिवेशनास ३५० पत्रकार उपस्थित राहणार !
जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांची माहिती
पिंपळगांव( ब )::-नांदेड येथे १७ व १८ ऑगस्ट रोजी होणाय्रा मराठी पत्रकार परिषदेच्या ४२ व्या अधिवेशनास नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे ३५० सभासद पत्रकार सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली.
         पिंपळगाव बसवंत येथे स्व.अशोकराव बनकर पतसंस्थेच्या सभागृहात नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणी व तालुकाध्यक्ष यांची संयुक्त बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, मराठी पत्रकार परिषद, मुबई हि देशभरातील मराठी पत्रकारांची पहिली संघटना असून मातृसंस्था असलेल्या परिषदेच्या आजवर झालेल्या प्रत्येक अधिवेशनात नाशिक जिल्ह्यातील पत्रकारांची लक्षणिय उपस्थिती राहिली आहे. हि परंपरा नांदेड येथील अधिवेशनात कायम राहणार असून जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सुमारे साडेतिनशेहून अधिक सभासद उपस्थित राहतील, असा विश्वास व्यक्त केला,
स्वागत निफाड तालुकाध्यक्ष अँड रामनाथ शिंदे यांनी केले.
       सरचिटणीस कल्याणराव आवटे यांनी प्रस्ताविक करुन तालुकानिहाय अधिवेशन नियोजनाचा आढावा घेतला. प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र पाटील, विभागीय सचिव अण्णासाहेब बोरगुडे, रवींद्र बोरसे, सुधाकर गोडसे, हिरामण चौधरी, अँड रामनाथ शिंदे आदींनी चर्चेत सहभाग घेत नियोजनाबाबत मनोगते व्यक्त केली.
          बैठकीत प्रत्येक तालुकानिहाय झालेल्या नियोजनाबाबत आढावा घेण्यात आला.अधिवेशनास उपस्थित राहणाय्रा पत्रकारांसाठी निवासव्यवस्थेसह प्रवास अन्य सुविधांबाबत जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी महत्वपुर्ण सुचना देत मार्गदर्शन केले.
बैठकिस सरचिटणीस कल्याणराव आवटे
परिषद प्रतिनिधी किशोर वडनेरे,विभागीय सचिव अण्णासाहेब बोरगुडे,खजिनदार
विजय बोराडे,सह संघटक काशिनाथ हांडे,सह सरचिटणीस मनोज देवरे, प्रसिध्दीप्रमुख नरेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष  सुधाकर गोडसे,निफाड तालुकाध्यक्ष अँड रामनाथ शिंदे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य शरद मालुंजकर,दशरथ ठोंबरे,विनायक माळी,
शाम खैरनार, निफाडचे माजी तालुकाध्यक्ष शरद जाधव,चांदवड तालुकाध्यक्ष सुभाष पुरकर,निफाड तालुका सहचिटणीस सोमनाथ चौधरी,सुरगाणा तालुकाध्यक्ष हिरामण चौधरी,येवला तालुकाध्यक्ष राकेश गिरासे,मंगलसिह राणे, संजय निकम,मुकबुल शेख,कैलास माळी,युसूफखान पठाण,रविंद्र पगार, कळवण तालुकाध्यक्ष रविंद्र बोरसे आदींसह पत्रकार उपस्थित होते आभार विभागिय सचिव अण्णासाहेब बोरगुडे यांनी मानले. 

Comments

Popular posts from this blog

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नतीने पदस्थापना ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!