जेष्ठ विचारवंत, लेखक, राजकारणी तथा दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले काळाच्या पडद्याआड ! केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शोक व्यक्त केला !! न्यूज मसाला परीवार नासिक कडून भावपूर्ण श्रद्धांजली !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

महान लढवय्ये विचारवंत राजा ढाले यांचे निर्वाण !
दलित पँथर चे संस्थापक,  आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार,  ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचे आज दि. १६ जुलै रोजी सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवारी दुपारी 12 वाजता विक्रोळी (पू) येथील त्यांच्या निवसस्थानाहून निघणार,  दादर चैत्यभूमी येथिल इलेक्ट्रिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, आता त्यांचे पार्थिव गोदरेज रुग्णालय येथे नेण्यात येत असल्याची माहिती त्यांची कन्या गाथा ढाले यांनी दिली आहे.
राजा ढाले यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळताच आंबेडकरी जनतेत तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजा ढाले यांच्या निधनाची वार्ता कळताच तीव्र शोक व्यक्त केला आहे. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार ; मार्गदर्शक, दलित पँथर चा महानायक हरपला आहे अशी शोकभवना व्यक्त करून ना रामदास आठवले यांनी दिवंगत राजा ढाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली .
न्यूज मसाला परीवाराकडून भावपुर्ण श्रद्धांजली !
राजा ढाले यांचा जन्म १९४० साली झाला होता, निर्वाण समयी ते ७८ वर्षांचे होते, भारतीय स्वातंत्र्यालाच प्रश्र्न करणारा " काळा स्वातंत्र्यदिन" हा तत्कालीन परीस्थितीत गाजलेला लेख त्यांनी लिहिला होता, त्यांचे अनेक लेख चक्रवर्ती, विद्रोह, तापसी,येरू, जातक आदी अनियतकालीकांमधून प्रसिद्ध झाली आहेत, मात्र त्यांनी त्याचा संग्रह करण्याचा कधी प्रयत्न केला नाही त्यामुळे हे सारे साहित्य विखुरलेल्या अवस्थेत आहे, सर्वसामान्यांपर्यंत त्यांनी केलेले लिखाण पोहचविण्याचे अवघड दिव्य मात्र पार पाडले होते, यातूनच त्यांनी अरुण कांबळे व नामदेव ढसाळ यांच्या मदतीने "ललित पॅंथर" नावाची सामाजिक संघटना स्थापन केली होती.

Comments

  1. समाजासाठी त्यांनी केलेले काम प्रेरणादायी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जय बुद्ध.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

फ्युचर मेकर बद्दल वितरकांची कुठलीही तक्रार नाही-ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी , फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक असुन लवकरच कंपनी आपले व्यवहार सुरू करणार-बापू ढोमसे, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!