मुख्यमंत्र्यांना कर्मचारी महासंघाचा इशारा ! कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा,अन्यथा संप करण्याची वेळ येईल असं करु नका, असा इशारा जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाकडून निदर्शने करून देण्यात आला !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत  प्रश्न मार्गी लावा ....
अन्यथा संपाची वेळ आणू नका ..
जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाचा इशारा ..
जिल्हा परिषद व सर्व पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर आज  दि. ३ जुलै रोजी जिल्हा परीषद कर्मचारी महासंघ व सलग्न सतरा संवर्गीय कर्मचारी संघटनांचे वतीने संपाचे पाश्र्वभूमीवर दि ४ ऑगस्ट १८ ला मा. मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने, जोरदार निदर्शने करून प्रलंबीत प्रश्न मार्गी लावण्यासाठी  शासनाचे लक्ष वेधण्यात आले. या वेळी सर्व संवर्गीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.प्रमुख मागण्या :
राज्य सरकारी कर्मचारी यांना केंद्राप्रमाणे वेतन भत्ते देणे, अशंदायी पेन्शन योजना रद्द करून जुनीच  पेन्शन योजना लागू करणे, सर्व विभागातील रिक्त पदे तातडीने भरणे, अनुकंपावरील नियुक्त्या तात्काळ देणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे,
केंद्राप्रमाणे निवृत्तीचे वय ६० वर्ष करणे, पाच दिवसाचा आठवडा लागू करणे, केंद्राप्रमाणे महिला कर्मचारी यांना दोन वर्ष संगोपन रजा मंजुर करणे,सहाय्यक गटविकास अधिकारी यांचे नविन पदे निर्माण करुन जिल्हा परीषद संवर्गातून रिक्त व नविन पदे भरणे, परीभाषीत पेन्शन योजनेतील कर्मचारी यांचे १० वर्षाचे आत मृत्यु झाल्यास वारसास १० लाख सानुग्रह अनुदान मंजुर करणे, अंशदाई पेन्शन धारकाचा मृत्यु झाल्यास कुंटूब निवृत्तीवेतन व ग्रॅच्युईटी देणे ,  सर्व विभागातील कर्मचारी यांचे वेतन त्रुटींचे निवारण करणे, याशिवाय
बक्षी समीतीचा दुसरा खंड मंजुर करून  सातवा वेतन आयोगाची अमंलबजावणी तात्काळ पूर्ण करणे.
जानेवारी १९ चा महागाई भत्ता मंजुर करणे, क्षेत्रीय कर्मचारी यांना प्रवास भता पगारा बरोबर देणे या प्रलंबीत मागण्या बाबत
ठोस निर्णय घ्या , अन्यथा दि.२० ऑगष्ट १९ चा लाक्षणिक संपाची वेळ आणू नका असे निवेदन  मुख्यमंत्री यांना मा.जिल्हाधिकारी यांचे मार्फत देण्यात आले. अशी माहिती राज्य महासंघाचे विभागीय उपाध्यक्ष कैलास वाकचौरे , जिल्हा अध्यक्ष अरुण आहेर, सरचिटणीस  महेंद्र पवार , कार्याध्यक्ष डॉ .भगवान पाटील यांनी दिली.
             यावेळी बापसाहेब कुलकर्णी,मधुकर आढाव, बापुसाहेब अहिरे, मंगला भवार,श्रीधर सानप, जगन्नाथ सोनवणे, गोटीराम खैरणार, प्रमोद निरगुडे, विजय देवरे, फैयाज खान, यासीन सैय्यद, आर एन पाटील , नामदेव भोये, सुभाष अहिरे, चंद्रशेखर फसाळे, सचिन विंचुरकर, अनिल घुगे , विजय सोपे, योगेश गोळेसर, मधुकर गांगुर्डे , विनया महाले, ज्योती गांगुर्डे , सोनाली भार्गवे , सोनाली साठे ,धनश्री पवार, उज्वला रावळ , वर्षा जाधव, विलास शिंदे , किशोर वारे,मदन वाडेकर, विक्रम पिंगळे, दिनेश राजवाडकर, राजेश ठाकूर आदी उपस्थीत होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!