बालविवाह रोखणे यंत्रणेतील प्रत्येकाची जबाबदारी - लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, जि.प.

महिला बालकल्याण विभाग व यूनिसेफची एकत्रित बैठक !

 बालविवाह रोखणे यंत्रणेतील प्रत्येकाची जबाबदारी - लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, जि.प. नाशिक

        नाशिक - जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आज महिला व बालकल्याण विभाग आणि यूनिसेफ (UNICEF) या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, महिला व बालकल्याण विभागाच्या एक मूठ पोषण कार्यक्रम, नवजात बालकांची संख्या व कमी वजनाची बालके, सर्वसाधारण वजनाची बालके त्याचबरोबर बाल आधार नोंदणी यासंदर्भात आढावा घेत प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली, ग्रामीण भागात बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणेतील सर्व घटकांनी एकत्र येत काम करावे, अंगणवाडी सेविकांनी किशोरवयीन मुलींचे मेळावे घ्यावे व महिला बचत गटांच्या मासिक सभा, ग्रामसभा यामध्ये बालविवाह रोखण्यासाठी प्रबोधन करत लोकसहभागातून बालविवाह थांबवण्यासह बालविवाह करण्याच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी काम करावे असे निर्देश या बैठकीत दिले, उपस्थित बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी यावेळी कशा पद्धतीने बालविवाह रोखले याबाबत सांगितले. 

__________________________________
 एक-
          त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव मध्ये साडेचौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलगी व साडेवीस वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा विवाह होणार असल्याचे प्रशासनाला कळाले, यावेळी प्रशासनाने तात्काळ देवगाव येथे विवाह स्थळ गाठत हळदीच्या दिवशी अल्पवयीन मुलगा-मुलगी व दोघांचे कुटुंबीय यांचे समुपदेशन करून हा विवाह थांबवण्यात आला असल्याची माहिती त्र्यंबकेश्वरच्या बालविकास प्रकल्प अधिकारी भारती गेजगे यांनी दिली. 
_

_______________________________
 दोन-
             निफाड तालुक्यातल्या तारुखेडले या गावातील १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह होत असतांना प्रशासनाने वेळीच दखल घेऊन अल्पवयीन मुलीच्या शाळेत जाऊन जन्म तारखेची पडताळणी केली आणि मुलीसह आई वडिलांचे समुपदेशन करत हा विवाह बेकायदेशीर आहे, त्याचबरोबर हा विवाह झाल्यास तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे सांगत समुपदेशन केले आणि हा विवाह थांबवण्यात आला अशी माहिती निफाड तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी आरती गांगुर्डे यांनी बैठकीत दिली.
__________________________________
   

    यूनिसेफ च्या सीमा कानोळे यांनी  बालकांशी निगडित योजना कशा प्रकारे राबवाव्यात, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानांकने यासंदर्भात मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजीव म्हसकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, यूनिसेफ (UNICEF)  संस्थेकडून सीमा कानोळे आदीसंह सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।