सुभाषित दिवाळी अंकाला प्रकाशक संघाचा प्रथम पुरस्कार जाहीर !

सुभाषित दिवाळी अंकाला प्रकाशक संघाचा प्रथम पुरस्कार जाहीर !

       नाशिक-२३(वार्ताहर) अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने आयोजित केलेल्या उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये नाशिकच्या सुभाषित या विनोदी दिवाळी अंकाला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रकाशक संघाचे कार्यकारीणीने नुकतेच हे पुरस्कार जाहीर केले.

स्पर्धेतील उत्कृष्ट दिवाळी अंकाचे पुरस्कार विविध विषयांवरील दिवाळी अंकास जाहीर करण्यात आले आहेत. नाशिक येथुन प्रकाशित होणाऱ्या सुभाष सबनीस संपादक असलेल्या सुभाषित दिवाळी अंकाला यावर्षी मिळालेला दुसरा पुरस्कार असुन गेल्या अकरा वर्षात एकुण तेरा पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत सुध्दा सुभाषितने दिवाळी अंक प्रकाशनात खंड पडु दिला नाही हे विशेष.

सुभाष सबनीस यांचे मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्था, नाशिक कवी, मराठी कथालेखक संघ, या संस्थां तसेच सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक