राज्यस्तरीय गझल लेखन महास्पर्धेच्या चौथ्या पर्वाला जानेवारीपासून प्रारंभ !

राज्यस्तरीय गझल लेखन महास्पर्धेच्या चौथ्या पर्वाला जानेवारीपासून प्रारंभ !

       मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : उभ्या महाराष्ट्रात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या गझल मंथन साहित्य संस्थेच्या राज्यस्तरीय गझल लेखन महास्पर्धेच्या चौथ्या पर्वाला जानेवारी २०२३ महिन्यापासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्हाने गौरविण्यात येणार आहे.

        लिहित्या हातांना प्रोत्साहन देण्यासाठी व नवोदित गझलकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, ह्या उदात्त हेतूने गझल मंथन साहित्य संस्था दरवर्षी गझल लेखन महास्पर्धेचे आयोजन करते. या स्पर्धेच्या माध्यमातून संस्थेने आजपर्यंत अनेक गझलकारांना नावारूपास आणले आहे. हा उपक्रम पुढे निरंतर सुरू राहावा म्हणून संस्थेतर्फे चौथ्या पर्वाला जानेवारी महिन्यापासून प्रारंभ करण्यात येत आहे. ही स्पर्धा व्हाट्सअप समूहाच्या माध्यमातून ऑनलाईन घेतली जाणार आहे. महास्पर्धेचे नियम असे आहेत. दर महिन्याच्या ३० तारखेला स्पर्धा घेण्यात येईल. एकूण बारा फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक महिन्याला वेगळे वृत्त असेल आणि सुप्रसिद्ध गझलकारांकडून गझलेचे परीक्षण करण्यात येईल. प्रत्येक महिन्याच्या विजेत्यांना डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येईल. बारा फेऱ्यापैकी किमान १० फेऱ्यांमध्ये भाग घेणे आवश्यक आहे. प्रत्येक मासिक फेरीतील सर्वोत्कृष्ट क्रमांकास ६ गुण , उत्कृष्ट क्रमांकास ५ गुण, प्रथम क्रमांकास ४ गुण, द्वितीय क्रमांकास ३ गुण, तृतीय क्रमांकास २ गुण व उत्तेजनार्थ क्रमांकास १ गुण याप्रमाणे गुण देण्यात येतील. याप्रमाणे प्रत्येक फेरीत प्राप्त केलेल्या गुणांची बेरीज करून अंतिम निकाल तयार करण्यात येईल व गुणानुक्रमे महाविजेता व उपविजेते ठरविण्यात येईल. चौथ्या पर्वाची पहिली फेरी ही ३० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. प्रथम क्रमांकाला ३ हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, द्वितीय क्रमांकाला २५०० रूपये रोख सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, तृतीय क्रमांकाला २ हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, चतुर्थ क्रमांकाला १५०० रूपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पंचम क्रमांक  हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र अशा स्वरूपाचे बक्षीस देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जयवंत वानखडे (98236 45655) यांच्याशी संपर्क साधावा. राज्यातील जास्तीत जास्त नवोदित गझलकारांनी या महास्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष देवकुमार गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, प्रसिद्धीप्रमुख भरत माळी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।