गुरुपौर्णिमेनिमित्त सांगितिक गुरूंना विद्यार्थ्यांकडून सरगम अर्पण !

गुरुपौर्णिमेनिमित्त सांगितिक गुरूंना विद्यार्थ्यांकडून सरगम अर्पण !

             नाशिक ( प्रतिनिधी ) संगीत, गायन, वादन,  नृत्य या ललित कलाक्षेत्रात गुरु-शिष्य परंपरेला सर्वोच्च स्थान आहे. नंदकुमार देशपांडे संचलित सरगम म्युझिक अकादमीमध्ये काल गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. सकाळपासून रात्रीपर्यंत माजी-आजी विद्यार्थ्यांनी येऊन आपल्या सांगितिक गुरूंना त्यांनीच शिकवलेली सरगम अर्पण केली.

           पंचवटी कारंजाजवळ, लक्ष्मीबाळ सदन येथील सरगम म्युझिक अकादमीमध्ये यावेळी मनाली गर्गे, सुगंधा शुक्ल, वैशाली शुक्ल, सानिका जैन, प्रीती पाठक, चारुलता विसपुते, शालिनी विसपुते, नीलिमा टकले, सुवर्णा यादव, रवींद्र मानकर, अनुष अक्कर, सुभाष सावरेकर, प्रकाश रत्नाकर, धनंजय भावसार यांनी हार्मोनियम वादक आणि गायक नंदकुमार देशपांडे यांना उद्देशून गुरुभक्तीपर गाणे सादर केले. सर्व विद्यार्थ्यांनी गुरु परमात्मा परेशु..., माऊली गुरुमाऊली..., धाव धाव गुरु माऊली..., विठू माऊली तू..., भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे अशी अनेक भक्ती गीते  सादर करून गुरूंविषयी आपला आदरभाव व्यक्त केला. अकॅडमीतील सर्व विद्यार्थी आणि पालकही उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।