तलाठ्यास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले !!

तलाठ्यास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले !!
     
         नासिक::- इगतपुरी तालुक्यातील सांजेगांव व मुरंबी येथील तलाठी सचिन काशिनाथ म्हस्के यांस २०००० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

           तक्रारदार व त्यांचे इतर ३ भागीदार यांनी मिळून इगतपुरी तालुक्यात मुरंबी गाव येथे जमीन खरेदी केली आहे. सदर जमिनीच्या गाव नमुना ७/१२ महसूल अभिलेखावर् नोंद करून देण्याचे मोबदल्यात लोकसेवक तलाठी नामे सचिन काशिनाथ म्हस्के यांनी २००००/- रुपये ची लाचेची मागणी करून काल दि. १ जुलै रोजी २००००/- रुपये पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
             सापळा अधिकारी संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पो. हवा. एकनाथ बाविस्कर, पो. ना. प्रकाश महाजन, पो. शि. नितीन नेटारे यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विवाहसंस्कृती की दिखाऊपणाचा बाजार ? समाज कोणत्या दिशेने चालला आहे./ दिखाव्याच्या स्पर्धेने उद्ध्वस्त होत चाललेला मध्यमवर्ग / उशिरा होणारे विवाह आणि अवास्तव अपेक्षा,,,,,,,,

लोकअदालतीत ३ हजार ७६२ प्रकरणे निकाली, ६४ कोटी रूपयांचे तडजोड शुल्क वसूल

खोटी माहिती सादर केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार ! उप अभियंत्यांनी दिलेला अंतराचा दाखला ग्राह्य धरला जाईल !! शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांबाबत डॉ. गितेंचा इशारा !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!