लाच स्वीकारताना तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

लाच स्वीकारताना तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

         नंदुरबार::- तळोदा तालुक्यातील अमलपाडा येथील तलाठी नंदलाल प्रभाकर ठाकूर यांस तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

              तक्रारदार यांच्या जमिनीच्या गाव नमुना ७/१२ महसूल अभिलेख्यावर नाव र्नोंद करून दिले आहे. तक्रारदार यांचे नाव सातबारा उताऱ्यावर लाऊन देण्याच्या करून दिलेल्या कामाबाबत व नवीन नावाच्या सातबारा उताऱ्यावर सही शिक्का देण्याच्या मोबदल्यात लोकसेवक तलाठी नंदलाल ठाकूर यांनी दिनांक २६ जून रोजी तक्रारदार यांच्याकडून ५०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३०००/- रूपये लाचेची मागणी केली. 
       तसेच मागणी केलेली लाचेची रक्कम ३०००/- रूपये आज दि ०३ जून रोजी पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
                  सापळा अधिकारी श्रीमती माधवी स. वाघ, पोलीस निरीक्षक, पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक  राकेश आ. चौधरी, सह सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक समाधान म. वाघ, सापळा कार्यवाही व मदत पथक पोहवा/ विजय ठाकरे, पोहवा/विलास पाटील, पोहवा/ज्योती पाटील, पोना/देवराम गावित, पोना/मनोज अहिरे , पोना/अमोल मराठे व चापोना /जितेंद्र महाले , सर्व नेम. ला.प्र.वि. नंदुरबार यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय , ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।