जिल्हा माहिती अधिकारीपदी विलास बोडके रूजू !

जिल्हा माहिती अधिकारीपदी विलास बोडके रूजू !

        नाशिक, दिनांक ०३ जुलै २०२३ (जिमाका वृत्तसेवा)::- नाशिक जिल्हा माहिती अधिकारीपदी विलास बोडके यांची शासनामार्फत नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार आज विलास बोडके यांनी जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी माहिती अधिकारी अर्चना देशमुख, उपसंपादक किरण डोळस यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते

            बोडके यापूर्वी धुळे येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होते. तत्पूर्वी ते जिल्हा माहिती अधिकारी म्हणून जळगाव, नंदुरबार येथे तसेच मालेगाव, नाशिक, पुणे आणि मंत्रालय, मुंबई येथे त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालया अंतर्गत विविध पदांवर सेवा बजावली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रक्तातही भ्रष्टाचार? कथित बनावट ब्लड प्लाझ्मा रॅकेट उघडकीस आल्याच्या वृत्ताने संपूर्ण देशातील रक्तदाते, रुग्ण, डॉक्टर आणि समाजमन हादरले !

आवाहन - बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत.स्थापन केलेल्या काम वाटप समितीच्या माध्यमातून १० लाखांपर्यंतची कामे विना निविदा देण्यात येणार !

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा १५वा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२६,