मत प्रदर्शन -(४) कोमल फलके, आष्टी, नागपूर, स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ? भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमांतर्गत मांडण्यात आलेले "मत प्रदर्शन" !


मत प्रदर्शन -(४) कोमल फलके, आष्टी, नागपूर,
स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ? 
भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमांतर्गत मांडण्यात आलेले "मत प्रदर्शन" !


        १) स्त्रिया उच्चशिक्षित असतील किंवा कोणीही उच्चशिक्षित असला म्हणजे त्याने नोकरी करायलाच पाहिजे असा त्या उच्च शिक्षणाचा अर्थ होत नाही किंबहुना उच्चशिक्षित सोबतच ज्याचे फंडामेंटल आणि कन्सेप्टस परिपूर्णपणे क्लियर असतात ते लोक नोकरीकडे न जाता स्वतः चा व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थ डॉक्टर, जे डॉक्टर्स स्वतःला परिपूर्ण समजतात ते स्वतःचा दवाखाना थाटून रोग्यांची  सेवा करतात व नंतर तज्ञ डॉक्टर म्हणून उदयास येतात परंतु त्यांच्या इतकी शैक्षणिक योग्यता असलेले लोक हे मेडिकल ऑफिसर वगैरे सारखे पदांवरती कार्यरत असतात 
          २) घरची परिस्थिती चांगली असेल तर त्या विचाराप्रमाणे नोकरी करायची गरज नाही परंतु फायनान्शियल स्टेटस आणि नोकरी या भिन्न बाबी आहेत, धंदा उद्योग व्यवसाय सर्वांनाच करणे जमत नाही आणि नोकरीमध्ये एक ठराविक वेळ सकाळी जाणे आणि सायंकाळी परत घरी येणे इतका वेळ आपण एंगेज केला तर आपल्याला महिन्याच्या शेवटीला एक ठराविक रक्कम केलेल्या कामाचा मोबदला ज्याला आपण पगार किंवा सॅलरी म्हणतो मिळत असते म्हणून घरची परिस्थिती जरी चांगली असली तरी पण स्त्रिया नोकरी करण्याकडे त्यांचा कल असतो.
          ३) ज्या जागेवरती स्त्रिया कार्यरत आहेत त्या जागेवरती एखाद्या गरजवंताला नोकरी मिळाली असती किंवा ती जागा मिळाली असती अशा प्रकारचा प्रश्नच मुळात चुकीचा आहे प्रत्येक जण आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे म्हणजेच आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे त्या त्या क्षेत्रामध्ये असतो त्यामुळे ज्याला गरज आहे त्यांनी त्याच्या क्षमतेप्रमाणे एखादं काम करावं किंवा नोकरी करावी मूळ विषय हा याबाबतीतला रिझर्वेशन आहे आरक्षण हे आपल्या बुद्धिमत्तेला लागलेली कीड आहे आणि त्यातून अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे स्वतःच कौशल्य तसं वाढवणे गरजेचे त्याला उदार मत ठेवले तर उत्तमच
          ४) घरी बसणे म्हणजे शिक्षण फुकट जाणे नाही आणि पिढी घडविण्याकरता घरीच असायला पाहिजे हेही गरजेचं नाही, संस्कार केले तर संस्कृती टिकेल आई-वडिलांनी त्या मुलीवरती पालक म्हणून जर सुयोग्य संस्कार केलेले असतील तर ती मुलगी आपल्या समोरच्या पिढीला निश्चितपणे सुसंस्कारित करेल आणि याकरिता सद्गुरुंची गरज असते, सद्गुरूंच्या सानिध्यात असलेली प्रत्येक व्यक्ती मग त्यामध्ये त्यांच्या आई-वडिलांनी जरी संस्कार केलेले नसतील तरी पण अशी व्यक्ती आपल्या समोरच्या पिढीवरती संस्कार करण्यास सक्षम होतेच होते, त्यामुळे सदर व्यक्ती जरी घरी असेल किंवा पूर्ण आठ ते दहा तास कार्यरत असेल तरी पण ती आपली भावी पिढी घडविण्यात यशस्वीच ठरते. त्यामुळे तिच्या शिक्षणाचा या संस्कारांसोबत योग्य सांगड घातली तर निश्चितपणे एक सक्षम कुटुंब सक्षम समाज व सक्षम राष्ट्र या शिक्षित असलेल्या महिलेच्या माध्यमातून तयार होऊ शकते व सुयोग्य पिढी घडवून देशाचं कल्याण घडवू शकते, म्हणूनच मागे स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं होतं की तुम्ही मला तुमचे तरुण मुलं द्या मी तरुण भारत, सक्षम भारत घडवू शकतो. ही जबाबदारी मुलगा असो की मुलगी दोघांचीही सारखीच असते
           ५) स्त्रियांनी स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग सक्षम करण्यासाठी कसा करता येईल याहीपेक्षा माझं म्हणणं असं राहील की स्त्री हीच सक्षम कुटुंब आणि पर्यायाने सक्षम देश उभा करू शकते. स्त्री एक क्षणभर सोडला तर ती प्रत्येकाची माताच असते, माता म्हणजेच ती गुरु असते आणि ती वात्सल्याची मूर्ती तर निश्चितपणे असतेच असते, तिला मुलगी असतानी आई-वडिलांना असं वाटते की माझी मुलगी माझ्या सहवासात राहिली पाहिजे किंवा मी तिच्या सहवासात राहिलो पाहिजे, समोर पतीला असं वाटते की मी तिच्या समोर सहवासात राहिलो पाहिजे, समोर मुलांना असं वाटते की मी माझ्या आईच्या सहवासात राहायला पाहिजे, त्याही समोर नातवंडांना असं वाटते की मी माझ्या आजी सोबत नेहमी राहायला पाहिजे, समजा जर ती एखाद्या विषयात पारंगत असेल तर त्या विषयाचे लोक त्या विषयाच्या अनुषंगाने त्या मूर्तीमंत वात्सल्याच्या नेहमी सहवासात राहून आपलं कल्याण करून घेत असतात, त्यामुळे पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रिया ह्याच सक्षम भारत म्हणजेच देश तयार करू शकतात, आपण अशा प्रकारची उदाहरणे यासाठी देऊ शकतो, कारण आपण ज्या सनातन वैदिक संस्कृतीच्या भारत देशामध्ये राहत आहोत या देशाला भारत माता म्हणतात, इतर सर्व देशांना इतर कोणत्याही देशांना जसे पाकिस्तान माता, इंग्लंड माता, रशिया माता अशी वगैरे कुठेही उपाधी नाही, जगात पृथ्वीवर फक्त भारतालाच "भारत माता" असं म्हटलं जाते याचं कारणच हे आहे.
           ६) स्त्रीला दुय्यम स्थानाचा तसा विषय हा कायमचा नसतोच, भारतीय संस्कृती आणि परंपरेचा व सनातन वैदिक संस्कृतीचा विचार केला तर आपली संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि पुरुषांनी कमावून आणायचं आणि स्त्रियांनी घराकडे लक्ष देऊन कुटुंब घडवायचं अशा प्रकारची विचारसरणी पारंपारिक आहे व ती विचारसरणी किंवा त्या विचारसरणीचा प्रभाव आजही कुटुंबा-कुटुंबांवरती दिसतो खरं म्हणजे दुय्यम स्थान हे स्त्रियांना देणे किंवा ते दुय्यम स्थानात आहेत असं समजणे हे तिच्यातील कमी किंवा जास्त प्रमाणामुळे नसते तर त्या घरच्या पुरुषांच्या बुद्ध्यांका वरती किंवा त्यांच्या संस्कारांवरती ते अवलंबून असते, कारण तसेही समजा, जर म्हटलं तर महत्त्वाची जडणघडण ही फक्त त्या घरातील आईच करते, कारण कमावून आणण्यापेक्षा जास्त ऊर्जा ती कुटुंबामध्ये बहाल करत असते, त्यामुळे कुठेही असा प्रश्न निर्माण होत नाही की तिने "हाउसवाइफ" असावं किंवा नसावं. हाउसवाइफ आहे म्हणजे तिच्यामध्ये कौशल्य नाही, तिला आर्थिक बाबतीत कुटुंबाला मदत करता येत नाही, म्हणून तिचं कुटुंबात स्थान नाही वगैरे असं काहीही नसते, पैसा हा जीवित राहण्याकरिता किंवा दैनंदिन व्यवहाराकरिता अत्यंत गरजेचं साधन आहे त्यामध्ये तिचा सहभाग कमी जरी असला तरी पण संसाधन म्हणजे त्याचं संवर्धन फक्त तीच करू शकते.
         ७) बदलत्या काळानुसार नोकरीच्या नावाखाली त्याच मुली संसारात दुर्लक्ष करताना दिसतात की ज्यांच्या विशेषता आईने तिच्या संसारामध्ये हस्तक्षेप करते किंवा त्या मुलीचे पालक म्हणजे आई वडील संस्कारित नसतात, त्याचमुळे त्या मुली आपल्या संसारात दुर्लक्ष करतात. कारण आजच्या समाजामध्ये लग्न झाल्यानंतर महिना दोन महिन्यात सहा महिन्यात वर्ष दोन वर्षांमध्ये "divorse" फारकत  घटस्फोटाचे प्रमाण फार वाढीला लागलेले आहेत व दुसरे लग्न सुद्धा राजरोसपणे वाजत गाजत करण्यात येत आहे. परंतु ज्या कारणावरून घटस्फोट झाला ती कारण किंवा त्या सवयी समोरच्या नवीन जोडीदारांमध्ये नसतीलच असं कशावरून ?
             मग जरी अशा न आवडणाऱ्या सवयी दुसऱ्या लग्नानंतर जोडीदारांमध्ये असतील तरी पण हे दुसरे नवविवाहित जोडपे ॲडजस्टमेंट करूनच जीवन जगत असतात असं सध्या दिसत आहे. परंतु दुसऱ्याही लग्नामध्ये पुन्हा घटस्फोट घेतला आणि तिसरं लग्न केलं असं बाकी निश्चितच दिसत नाही.
          म्हणजेच पहिल्या लग्नानंतर समजा जर सामंजस्यांनी घेतलं, सर्व बाबींवरती ऊहापोह करून समजूतीची जागा घेतली तर निश्चितपणे त्यातून मार्ग निघू शकतो, त्यामुळे मुलींनी-मुलांनी संसाराकडे दुर्लक्ष न करता किंबहुना संसार तीच सांभाळू शकते आणि तशी तिला ऊर्जा सुद्धा निसर्गाने म्हणजेच परमेश्वराने दिलेली आहे
           ८) घटस्फोट हा प्रकारच कोणालाही नकोच असतो आणि ते योग्य पण नाही, खरं म्हणजे हे पुरुषांपेक्षा स्त्रीने जर ठरवलं की मी माझ्याशी, फक्त माझ्या पतीशीच सांभाळून ठेवेल तर मग परपुरुषांचा किंवा अन्य बाबींचा त्यामध्ये इंटरफेअरच होत नाही, त्यामुळे कमवायला बाहेर निघाली म्हणून मी खूप मोठी आहे असं कोणीही समजू नये, मग पुरुषांचं काम जरी कमवायचं असेल तरी पण त्यांनी सुद्धा मी कमावतो याचा अहंकार न बाळगता आज पुरुष असो किंवा स्त्री असो त्या दोघांनाही आपल्या संसाराची घडी योग्य दिशेने या महागाईच्या काळात चालू ठेवायची असेल तर आर्थिक बाब म्हणून कमावण्याकरता सात-आठ तास बाहेर एकमेकांपासून दूर राहायला हरकत नाही परंतु घटस्फोट वगैरे ह्या बाबी आपल्या मानसिकतेच्या डिक्शनरी मधून कायमस्वरूपी डिलीट करून टाकल्यास घटस्फोट किंवा असल्या समाजविघातक गोष्टी आपल्या डोक्यात कधी शिरकाव घालणारच नाही.

कोमल धनराज फलके,
आष्टी, नागपूर.

भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रम विषय: मत प्रदर्शन,
हा एक भारतीय कोल्हापूर मंच आयोजित  मतप्रदर्शन उपक्रम असून सदर लिखाण हे लिहिणाऱ्या चे वैयक्तिक मत आहे, या मतांशी संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही.
            संपादक
     न्यूज मसाला, वृत्तसेवा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।