आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव 
न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक
7387333801
 
     नासिक (सातपूर)::- समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येवून उत्सव साजरे करावेत या उद्देशाने लाेकमान्य टिळकांनी सार्वजनिक उत्सव सुरू केले. या उत्सवाचे निमित्ताने सातपूर येथील महिला ‘आनंद मेळावा’ साजरा करतात. अशा उत्सवांमुळे टिळकांचा उद्देश सफल हाेत असल्याचे प्रतिपादन सातपूर पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक पंकज भालेराव यांनी केले. 

          सातपूर काॅलनीतील श्रीराम हाइट्स साेसायटीतील गणराज मित्र मंडळाच्या वतीने आनंद मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. या मेळाव्याचे उद्घाटन वरिष्ठ निरीक्षक भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्याच्या निमित्ताने महिलांनी विविध खाद्य पदार्थांचे स्टाॅल लावत खवैयांना मेजवानी उपलब्ध करून दिली. प्रत्येक महिलेने जीभेवर चव रेंगाळत राहावी असे पदार्थ तयार केले हाेते. 

 साेसायटीतील सर्वांनी एकत्र येऊन खाद्यपदार्थांची चव चाखावी यासाठी अतिशय नाममात्र दरात खाद्यपदार्थांची यावेळी विक्री करण्यात आली. यात पावभाजी, पाणीपुरी, मसाला दुध, आप्पे, भेळ, कचाेरी, वडापाव, मिसळपाव, शेव पाेहे, साॅफ्ट ड्रींक आदी पदार्थांचा समावेश हाेता. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी रेखा पाटील, रंजना घाेणे, ज्याेती वानखेडे, अंजली दंडगव्हाळ, शुभांगी पाटील, पुष्पा बांगर, स्नेहा केतकर, माया गायधनी, रंजना कदम, राेेहीणी देशमुख, अलका वाणी, राणी देबनाथ आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !