महिला अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

महिला अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

      नासिक::- आलोसे स्नेहल सुनील ठाकुर, व्यवसाय अधिकारी, व्यवसाय कर अधिकारी कार्यालय, क्रुषी औद्योगिक संघ ली. इमारत क्र. ३, द्वारका नाशिक यांनी तक्रारदाराकडे ५००० रुपयांची लाच मागितली होती, तडजोडीअंती ४००० रुपयांची लाच पंचांसमक्ष स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या वतीने ताब्यात घेण्यात आले.

            तक्रारदार यांनी त्यांचे कल्पदीप इंडस्ट्रीयल सेक्यूरिटी सर्व्हिसेस ही कंपनी दोन वर्ष पासुन बंद असल्याने तिचा व्यवसाय कर रद्द व्हावा यासाठी दि. १३ सप्टेंबर २०२३ रोजी व्यावसाय कर अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. सदर व्यवसाय कर रद्द करून देण्याच्या बदल्यात लोक सेविका स्नेहल ठाकुर यांनी तक्रारदार यांचेकडे पंचांसमक्ष लाच मागितली व ती स्विकारताना पंचासमक्ष स्विकारल्याने  त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
                 सापळा अधिकारी, विश्वजीत पांडुरंग जाधव, पोलीस उपाधिकारी, सापळा गाव पो. ह .प्रकाशे, पो. ना. प्रणय इंगळे, म. पो. शि. शितल सूर्यवंशी, चालक पो. ह. संतोष गांगुर्डे, सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलिस अधीक्षक, माधव रेड्डी, अपर पोलिस अधिकारी, नरेंद्र पवार, वाचक, पोलिस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिकच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकच्या जडणघडणीत मविप्रचा मोलाचा वाटा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिमाखात उद्घाटन

कौशल्याचे प्रशिक्षण घेऊन महिलांनी स्वावलंबी व्हावे – हेमलता बिडकर

ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेडच्या आयपीओला उत्तम प्रतिसाद - आयपीओच्या पहिल्याच दिवशी २.१ पट प्रतिसाद. इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड चा आयपीओ २८ ऑगस्ट २०२६ रोजी उघडला, प्रति इक्विटी शेअर किंमत पट्टा (Price Band) ₹४०८ ते ₹४२९ निश्चित (दर्शनी मूल्य ₹१ प्रति शेअर). • प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा ₹४०८– ₹४२९ निश्चित. •बोली/इश्यू उघडण्याची तारीख – २८ ऑगस्ट २०२६ आणि बोली/इश्यू बंद होण्याची तारीख – १ सप्टेंबर २०२६. • किमान बोली लॉट ३४ इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर ३४ इक्विटी शेअर्सच्या पटीत