खाजगी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना देण्यात आली, ग्रामसेवकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा!!!

नाशिक – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत आज खाजगी शाळेतील १९ अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांना समुपदेशनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पदस्थापना देण्यात आली.
      विभागात अतिरिक्त ठरलेल्या खाजगी शाळांमधील १९ शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना देणेबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जिल्हा परिषदेला निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली झनकर, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी संबंधित शिक्षकाना समुपदेशनाने पदस्थापना दिली.
८६ ग्रामसेवकांना वरिष्ठ वेतनश्रेणी
नाशिक-  जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामसेवक संवर्गातील १२ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या ८६ ग्रामसेवकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आल्याची माहिती जिलहा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली. शासन निर्णयानुसार १२ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या ग्रामसेवकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात येतो. यासाठी पदोन्नती समितीसमोर ८६ प्रस्ताव सादर करण्यात आले होते. या सर्व ग्रामसेवकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।