निकालापूर्वीच छावा क्रांतीवीर सेनेच्या संस्थापक अध्यक्ष यांचा भविष्यकालीन विजयावर शिक्कामोर्तबच म्हणावे लागेल !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

लोकसभेच्या निकालापूर्वीच करन गायकर विजयी !
नासिक::- छावा क्रांतीवीर सेना संस्थापक अध्यक्ष करन गायकर यांनी नासिक लोकसभा मतदार संघातून असलेली उमेदवारी भाजपा-शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी मागे घेतली असे जाहीर केले.
         मराठा क्रांती मोर्चा व छावा क्रांतीवीर संघटनेच्या माध्यमांतून करन गायकर यांनी राज्यभरांत मोठा जनसंपर्क प्रस्थापित केला आहे. नासिक जिल्ह्यातही त्यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने लोकसभेची निवडणूक लढविण्याचा विचार केला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला, शेतकरी कुटुंबातील अवघ्या ३१ व्या वर्षी लोकसभा निवडणुकीत नशीब अजमावण्याची तथा एखाद्या उमेदवाराला पराजित करू शकण्याचे उपद्रवमुल्य निर्माण करण्याची ताकद कमविली ती निर्विवाद म्हटल्यास गैर नसावे. मात्र आज माघारीच्या शेवटच्या काही तासांत त्यांनी आपली उमेदवारी माघे घेउन भविष्यातील राजकीय वाटचालीसाठीचा विजय मिळविला असेच म्हणावे लागेल.
           करन गायकर यांनी कुणाच्या सांगण्यावरून उमेदवारी मागे घेतली हा विषय राजकारण्यांसाठी चर्चेचा असेल परंतु आजची छावा क्रांतीवीर सेना भविष्यात राजकीय पक्षात परावर्तित झाल्यास महाराष्ट्रातील तमाम छाव्यांसाठी गावच्या सदस्य पदापासून खासदारकीपर्यंतची दारे उघडणारी घटना असे आजत्या माघारीने घडले असे वाटते म्हणून करन गायकर यांचा वैयक्तिक पातळीवर नासिक लोकसभा मतदार संघातून विजय झालेला दिसतो. गायकरांनी माघार घ्यावी यांसाठी राज्याचे आजी-माजी मंत्री यांनी मध्यस्थी करावी तीही पक्षाच्या मुख्यालयातील आदेशाने व्हावी यांतच करन गायकर या सर्वसामान्य व्यक्तिमत्वाचं असामान्यत्व दडलेले दिसते, कोण उमेदवार निवडून येईल हे आताच सांगणे कठीण असले तरी करन गायकर हे मात्र माघार घेउनही विजयी ठरल्याचे दिसत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !