तीव्र पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये खाजगी विहीरींवरुन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा-कार्यकारी अभियंता पुरूषोत्तम ठाकूर ,,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक – सुरगाणा तालुक्यातील पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये तीव्र पाणी टंचाई असलेल्या म्हैसमाळ,गळवट, मोरडा व शिरीषपाडा या गावांसाठी खासगी विहिरीवरून टँकरद्वारे पाणी
पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर यांनी दिली.
सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ,गळवट, मोरडा व शिरीषपाडा या गावांमध्ये
दरवर्षी पाण्याची समस्या निर्माण होते. याठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. यावेळीही २ एप्रिल पासून या गावांना नियमित पाणी पुरवठा
करण्यात येत आहे. यासाठी ग्रामपंचायत माणी अंतर्गत वांगण येथील खाजगी विहिरीवरून पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. गेल्या दोन ते तीन
दिवसापासून या विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने पाण्याचे टँकर भरण्यास विलंब होत असल्याने सुरगाणा तालुक्यातील पळसन येथील विहीर अधिग्रहित करण्यात आली असून १५ एप्रिल पासून तेथून पाणी पुरवठा करण्यात
येणार असल्याची माहिती सुरगाणा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी केशव
गड्डापोड यांनी दिली. म्हैसमाळ येथे  कायमस्वरूपी नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार असून २०१८ – १९ च्या  राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यात या गावाचा समावेश करण्यात आला असून गळवड व मोरडा या गावांचाही योजनेत समावेश करण्यात आला
आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)