भगूर परिसरातून गोडसेंना विक्रमी मताधिक्य देणार – विजय करंजकर. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

भगूर परिसरातून गोडसेंना विक्रमी मताधिक्य देणार – करंजकर
            नाशिक-   स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूर शहर व परिसर हा भगव्याचा पाईक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागाने शिवसेनेची पाठराखण केली असून शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यातून लोकसभा निवडणुकीतही ही परंपरा कायम रहाणार आहे. महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांना भगूर पंचक्रोशीतून विक्रमी मते देणार आहे. त्यामुळे देवळाली विधानसभा मतदार संघ हा गोडसे यांना सर्वाधिक मताधिक्य देणारा मतदार संघ ठरणार असल्याचा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी व्यक्त केला.       
            भगूर येथे शिवसेना, भाजपा, रिपाई , रासप व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार खा. गोडसे यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन सेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते  करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात करंजकर बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्षा अनिता करंजकर, भाजपा तालुकाध्यक्ष तानाजी करंजकर, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, विधानसभा प्रमुख केशव पोरजे, कॅन्टोन्मेंट नगरसेवक बाबुराव मोजाड, युवासेना जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे, शहरप्रमुख विक्रम सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. विजय करंजकर यांनी भगूर शहरासह परिसरातील गावागावांमधील कार्यकर्त्यांनी गोडसे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे गोडसे यांच्या विजयामध्ये भगूर परिसराचा मोठा वाटा रहाणार असल्याची माहिती करंजकर यांनी दिली. या प्रसंगी भाऊसाहेब चौधरी, खा. हेमंत गोडसे, आ. योगेश घोलप आदींनी मार्गदर्शन करत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी जागरूक राहण्याचे आवाहन केले. 
          कार्यक्रमास महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उदघाटनानंतर संपूर्ण शहरातून रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी गोडसे यांचे महिलांनी औक्षण केले.

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ! ८ जानेवारीला देशव्यापी संप !! अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाम. छगन भुजबळ यांना देण्यात आले निवेदन ! मुख्यमंत्री यांनी आपला विशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा !! अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा !!! कुणी दिले निवेदन, जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!