शाखा अभियंत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

शाखा अभियंत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल !
नासिक::- आलोसे राजू पुणा  रामोळे, शाखा अभियंता, लघु पाटबंधारे उपविभाग सटाणा यांचे विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारीत सन २०१८) अन्वये सटाणा पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला.
        आलोसे राजु रामोळे याने जाखेडा धरणातून गाळ काढण्याचे मोबदल्यात तसेच गाळ काढण्याचे काम सुरू ठेवण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी १३ जून २०१९ रोजी १५०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. यासंबंधी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नासिक कार्यालयात तक्रार दाखल केली होती, त्यानुसार सापळा पूर्व पडताळणी दरम्यान पंचासमक्ष रामोळे याने तक्रारदाराकडून १५०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर रक्कम मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने आज दि. १९ जुलै १९ रोजी सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।