डॉ. ज्योती विनायक मेटे अस्थी विसर्जनासाठी नाशिकला येणार - अमित जाधव


डॉ. ज्योती विनायक मेटे अस्थी विसर्जनासाठी  नाशिकला येणार - अमित जाधव 

 : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय आमदार विनायकराव मेटे यांचे ऑगस्ट मध्ये मुंबई येथे राज्य सरकारने आयोजित केलेल्या मराठा आरक्षण बैठकीसाठी मुंबईच्या दिशेने जात असतांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर  पहाटेच्या सुमारास अपघाती निधन झाले आणि सर्व महाराष्ट्र राज्यातील शिवसंग्राम कार्यकर्ते व मराठा समाज बांधव पोरका झाला.
नाशिक जिल्ह्यात २२ ऑगस्टला स्वर्गीय आमदार विनायक मेटे यांचा अस्थी कलश नाशिक येथे आला व नाशिक जिल्ह्यात अनेक गावात ही कलश यात्रा अस्थी दर्शनासाठी गेली परंतु अस्थिंचे विसर्जन हे बाकी असल्याने ते रविवारी १० सप्टेंबर ला डॉ. ज्योती विनायक मेटे यांच्या उपस्थितीत होणार आहे डॉ. ज्योती मेटे या नाशिक येथे सहनिबंधक या पदावर कार्यरत आहे त्यामुळे त्यांना सांत्वनास्पद भेटण्यासाठी अनेक लोक इच्छुक आहेत. यासाठी मेटे यांचे निकटवर्तीय व शिव संग्रामचे जिल्ह्याचे नेते अमित जाधव यांच्या पिंपळगाव खांब च्या निवास्थानी शनिवारी वारी सकाळी ८ ते १० या वेळेत ज्योती ताई या लोकांना भेटणार आहे व त्यानंतर १० वाजता पिंपळगाव खांब येथून अस्थी कलश राम कुंडावर विसर्जित केल्या जातील याप्रसंगी स्व. विनायक मेटे यांचे बंधू रामहरी भैय्या मेटे ही उपस्थित राहणार आहेत अशी प्राथमिक माहिती अमित जाधव यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !