८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !


८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते नियुक्ती !

नाशिक - जिल्हा परिषद सेवेत अनुकंपा नियुक्ती मिळालेल्या ८४ परिचर कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अहर्तेनुसार पदोन्नती देण्यात आली, कनिष्ठ सहायक ५८, वरिष्ठ सहायक २, विस्तार अधिकारी सांख्यिकी ५, विस्तार अधिकारी कृषी १, विस्तार अधिकारी पंचायत १ कंत्राटी ग्रामसेवक १७ अशा परिचर कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हतेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते पदोन्नती देण्यात आल्या.
        जिल्हा परिषद सेवेत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येते शैक्षणिक अर्हतेनुसार पद शिल्लक नसल्याने अशा उमेदवारांना परिचर पदावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात आली होती. अशा ८४ परिचर कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याहस्ते पदोन्नती देण्यात आली. मुख्य कार्यकारी लीना बनसोड यांच्या कार्यकाळात सर्वाधिक अनुकंपा नियुक्ती करण्यात आल्या याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी अनुकंपा प्रतीक्षा यादीतील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना जिल्हा परिषद सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया देखील तत्काळ करावी असे निर्देशित केले. 


        या संपूर्ण प्रक्रियेत सामान्य प्रशासन विभागाचे सहायक प्रशासन अधिकारी उत्तम चौरे, रवींद्र आंधळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रणजित पगारे, निवृत्ती बगड, सचिन विंचूरकर, स्विय सहायक गौतम अग्निहोत्री, वरिष्ठ सहायक शीतल शिंदे, मंगेश केदारे, भास्कर कुंवर, विशाल कामडी, सुनील थैल, दिलीप टोपे, कानिफ फडोळ, राहुल देवरे, साईनाथ ठाकरे, ज्ञानेश्र्वर गायकवाड, गोविंद पाटील, दत्तात्रय बेलेकर, अशोक खेडूलकर, प्रमोद जाधव यांनी मेहनत घेतली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचायत समितीचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

नायब तहसीलदार लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःच्या अधिपत्याखाली करणार !