जागतिक फार्मासिस्ट दिवस विशेष एसएमबीटी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची ‘अशीही’ सामाजिक बांधिलकी !

जागतिक फार्मासिस्ट दिवस विशेष 
एसएमबीटी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची ‘अशीही’ सामाजिक बांधिलकी !

नाशिक (दि. २४ प्रतिनिधी)::-
शिक्षण घेताना केवळ पुस्तकी ज्ञानात न अडकवता विद्यार्थ्यांवर सामाजिक भान जपण्याचे संस्कार एसएमबीटीच्या औषधनिर्माण शास्र (फार्मसी कॉलेज) मध्ये केले जात आहेत. येथील विद्यार्थी रुग्णसेवेसोबतच जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन व्यसनमुक्तीपर पथनाट्य सादर करून जनजागृती करतात.

         नंदीहिल्स, धामणगाव घोटी खुर्द (ता. इगतपुरी, जि. नाशिक)  येथे १७ वर्षांपूर्वी एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी आणि डी. फार्मसी कॉलेज सुरु झाले असून औषधनिर्माणशास्त्रचे पदवी आणि पदविका असे दोन्ही अभ्यासक्रम याठिकाणी घेतले जातात. येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास, खेळ, संशोधन कॅम्पस इंटरव्ह्यू आदींना महत्व दिले जात असून निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या या कॅम्पसमध्ये विद्यार्थी सामाजिक बांधिलकी जपताना दिसतात. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण आर्थिक दुर्बल घटकातील आहेत. या रुग्णांना डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या औषधे समजावून सांगण्याचे काम येथील विद्यार्थी करतात. जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन हे विद्यार्थी पथनाट्याच्या माध्यमातून व्यसनमुक्तीपर जनजागृती करतात.
        विद्यार्थ्याकडून रक्तदान शिबिर तसेच कॉलेजच्या जवळच असलेल्या आधार सामाजिक संस्थेत जाऊन येथील वृद्धांना मदतीचा हात येथील विद्यार्थी करताना दिसून येतात.
         औषध विक्री हा फार्मसी क्षेत्रातील फार्मासिस्टच्या कामाचा मुख्य गाभा मानला जातो. रुग्णांना सुरक्षित, योग्य औषधे पुरवणे हे फार्मासिस्टचे मुख्य काम मानले जाते. याचीच जाणीव ठेवून या विद्यार्थ्यांना ठराविक काळात रुग्णालयात प्रत्यक्ष प्रवेश दिला जात असून त्यांच्याकडून हजारो रुग्णांना मदतीचा हातदेखील दिला जात आहे.
*********************************
सामाजिक आरोग्यात महत्वाची भूमिका बजावण्यासाठी फार्मासिस्ट् येणार्‍या काळात मोलाचे योगदान देतील. आमचे विद्यार्थी संशोधन करू लागले आहेत. समाजाचे आपण कुठेतरी देणं लागतो या उद्देशाने आपण काम करत असून येथून उत्तीर्ण झालेला प्रत्येक विद्यार्थी येथून संस्कार घेऊन जाणार आहे.

- डॉ. योगेश उशीर, प्राचार्य एसएमबीटी औषधनिर्माण महाविद्यालय.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचायत समितीचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

नायब तहसीलदार लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःच्या अधिपत्याखाली करणार !