आवाहन - बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत.स्थापन केलेल्या काम वाटप समितीच्या माध्यमातून १० लाखांपर्यंतची कामे विना निविदा देण्यात येणार !

आवाहन - बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत.
स्थापन केलेल्या काम वाटप समितीच्या माध्यमातून १० लाखांपर्यंतची कामे विना निविदा देण्यात येणार !

नाशिक

शासकीय व निमशासकीय कार्यालयातील विविध प्रकारची रु. १० लाखांपर्यंतची कामे बेरोजगारांच्या नोंदणीकृत सेवा सहकारी संस्थांना विना निविदा देण्यासाठी शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद तसेच जिल्हास्तरीय काम वाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीकडे शासकीय व निमशासकीय कार्यालयांकडून कामांचे प्रस्ताव प्राप्त होतात. त्यानुषंगाने नाशिक जिल्ह्यातील कार्यरत इच्छुक सेवा सहकारी संस्थांनी आपले प्रस्ताव दि. २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त वि. रा. रिसे यांनी केले आहे.

प्रस्तावासोबत 
१) सेवा सहकारी संस्थेचे ऑगस्ट २००० नंतर स्थापना करण्यात आल्याचे नोंदणी   प्रमाणपत्र (सहकार कायदा १९६० अंतर्गत)., 
२) संस्थेच्या मागील दोन आर्थिक वर्षांच्या लेखा परीक्षण अहवालांच्या छायाप्रती, 
३) सेवा सहकारी संस्थेतील सभासदांच्या सेवायोजन (एम्प्लॉयमेंट) चालू असलेल्या कार्डच्या छायाप्रतीसह अद्ययावत सभासद यादी., 
४) सेवा सहकारी संस्थेच्या उपविधीची छायाप्रत.,
५) संस्था किमान सहा महिने कार्यरत असल्याची कागदपत्रे., 
६) यापूर्वी सदर संस्थेने केलेल्या कामांची यादी., 
७) चालू आर्थिक वर्षात किती कामे मिळाली आहेत, याची माहिती., 
८) संस्थेच्या मागील आर्थिक वर्षातील बँक खात्याचे विवरणपत्र., 
९) संस्थेच्या बँक पासबुकची छायाप्रत आदी कागदपत्रे जोडावीत.

प्रस्ताव विहित नमुन्यात दि. २१ ऑगस्ट २०२७ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने nashikrojgar@gmail.com या ई-मेलवर किंवा ऑफलाइन पद्धतीने कार्यालयात सादर करावेत, असेही आवाहन सहाय्यक आयुक्त श्री. रिसे  यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुंबई-धुळे मार्गिका खुली, वाहतुकीला दिलासा !

सिडकोतील महिलांनी हेमंत गोडसे यांचे औक्षण करून दिल्या विजयीभव च्या शुभेच्छा !! तरुणांनी काढलेली मोटारसायकल रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची विद्यार्थी परिषद निवडणूक संपन्न