रेडीमिक्स च्या टिझर ची मोहीनी ! प्रचंड क्रेझ निर्माण करण्यात होतोय यशस्वी ! फेसबुक, इन्ट्राग्राम, ट्विटरवर ९ जानेवारीपासुन घोडदौड सुरूच !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

सचिन खेडेकरांचारेडीमिक्सटिझरला आवाज!

 ‘रेडीमिक्सटिझर सोशल मीडियावर!

अमेय विनोद खोपकर यांच्या ‘एव्हीके फिल्म्स’ प्रस्तुत आणि ‘कृती फिल्म्स’, ‘सोमिल क्रिएशन्स’ निर्मित, शेखर ढवळीकर लिखित व जालिंदर कुंभार दिग्दर्शित 'रेडीमिक्स' या आगळ्यावेगळ्या मराठी चित्रपटाचा 'टिझर' म्हणजे ‘पहिली मुख झलक' सोशल मीडियावर रसिकांसाठी आज प्रदर्शित झाली. ती पहाताच रसिकांमध्ये चित्रपटाविषयी विशेष उत्कंठा आणि आकर्षण निर्माण झालं आहे. आजचा आघाडीचा युथ आयकॉन - अर्थात लव्हरबॉय वैभव तत्ववादी, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी यांच्या व्यक्तिरेखांचं विलोभनीय दर्शन आणि त्यावर अभिनेते सचिन खेडेकर यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजातील मोजक्या शब्दातलं खुमासदार वर्णन यामुळे ही पहिली झलक रसिकांवर मोहिनी घालत आहे. कलाकारांच्या व्यक्तिरेखा नेमक्या कश्या आहेत? आणि चित्रपटाचा 'पोत' काय आहे? हे लक्षवेधी दृकश्राव्य काही सेकंदात दाखवून विशेष किमया साधली आहे. त्यामुळे या 'टिझर'ने नेटकऱ्यांमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे.

‘एव्हीके फिल्म्स’चे अमेय विनोद खोपकर प्रस्तुत 'रेडीमिक्स' चित्रपटाचा संपूर्ण डोलारा कसा आहे? हे काही मोजक्या दृश्यांतून अचूक दाखवून लक्ष वेधण्यासाठी खास ‘'टिझर'ची निर्मिती करण्यासाठी विशेष तज्ञांची नेमणूक करून सव्वा दोन तासाच्या चित्रपटातून काही निवडक दृश्यांची सरमिसळ करून काही सेकंदांचा हा 'टिझर' तयार करण्याची ही अवघड कला फारच विलक्षण म्हणता येईल. ती लीलया पेलण्यासाठी विशेष लौकिक असलेले सर्जनशील पब्लिसिटी डिझायनर सचिन गुरव यांचे कलाकौशल्य पणाला लागले आहे. चलचित्राच्या या  आकर्षक व्हिडीओचा ‘टिझर’ प्रभावी करण्यासाठी ‘व्हीडीओव्हीडीओ’ या विशेष संस्थेच्या तज्ञांनी आपलं कसब दाखविलं आहे.

निर्माते प्रशांत घैसास, सुनील वसंत भोसले निर्मित आणि जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘रेडीमिक्स’मध्ये समीर चिटणीस या उमद्या तरुण इंटिरियर डेकोरेटरच्या आयुष्याची गोड कथा आहे. त्याच्या आयुष्यात नुपूर ही सुंदर तरुणी येते, आणि त्यानंतर त्याचे आयुष्य रोमँटिक वळण घेते. आजचा आघाडीचा युथ आयकॉन - अर्थात लव्हरबॉय वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरे आणि हरहुन्नरी अभिनेत्री नेहा जोशी यांच्या अफलातून अभिनयाचं रसायन नक्कीच प्रफुल्लीत करणारं आहे. जोडीला अभिनेते सुनिल तावडे, आनंद इंगळे, नेहा शितोळे, गिरीश परदेसी, आशा पाटील, रमा नाडगौडा, अश्विनी कुलकर्णी, उदय नेने, राजू बावडेकर, आशिष गोखले इत्यादी कलाकारांची अफलातून साथ आहे.

डीओपी संदिप पाटील यांच्या व्हिजनरी कॅमेऱ्यातून ‘रेडीमिक्स’चं सौंदर्य खुलल आहे. गीतकार गुरु ठाकूर, अश्विनी शेंडे, अभय इनामदार यांनी शब्दबद्ध केलेल्या गीतांना लोकप्रिय संगीतकार अविनाश–विश्वजित यांनी संगीतसाज चढवला आहे. गायिका आर्या आंबेकर, मुग्धा कऱ्हाडे, शिखा जैन, गायक आशिष शर्मा, फराद भिवंडीवाला, विश्वजित जोशी यांनी त्यावर स्वरसाज चढविला आहे. कोरिओग्राफर दिपाली विचारे यांनी नृत्यरचना केली आहे. संतोष गोठस्कर यांचं वेगवान संकलन असून कार्यकारी निर्मितीची सूत्रे प्रवीण वानखेडे यांनी सांभाळली आहेत. पूजा कामत यांनी केलेल्या वेषभूषेवर सुहास गवते यांनी रंगभूषा केली आहे.

Comments

Popular posts from this blog

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नतीने पदस्थापना ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!