योग आणी भोग जीवनरूपी नाण्याच्या दोन बाजू आहेत ! दुर्गुणांना खड्यासारखे दूर करून जीवनशुद्धी शक्य-कंठभूषण संतोषगीरी महाराज !! विष्णूदास चारूदत्त यांच्या दत्तशुद्दीका चे प्रकाशन !!

"कलियुगातील निरस जीवनाला दिशा देणारी दत्तशुध्दिका प्रकाशीत"
दुर्गुणांना खड्यासारखे दूर करून जीवनशुध्दी शक्यः कंठभुषण संतोषगीरी महाराज
        नाशिक/प्रतिनिधी::-योग आणि भोग जीवन रूपी नाण्याच्या दोन बाजू आहेत,त्या परस्परांशी एकरूप होऊ शकत नाहीत ,एकाचा दुसऱ्यावर प्रभाव पडतो तेंव्हा एक बाजू कमकुवत होते. आणि ज्या बाजूचा प्रभाव अधिक तसे मनुष्याचे जीवन घडते. हे वास्तव ज्ञान संदेश देणारी दत्त शुध्दिका कलियुगात  निरस बनलेला जीवनसार खमंग बनविण्यास  नक्कीच मार्गदर्शक ठरेल अशा शब्दात संतश्रेष्ठ मौनगीरी जनार्दन स्वामी-प.पू. माधवगीरी महाराज यांचे अनुयायी  कंठभुषण ह.भ.प. संतोषगीरी महाराज यांनी विष्णूदास चारूदत्त थोरात यांच्या हस्तलिखीत पुस्तिकेचे प्रकाशनाचे कौतूक केले.
वयाच्या दुसऱ्या वर्षापासून गुढ लिखाण करणारा चारूदत्तच्या हातून काही अदभूत साहित्य प्रसवले जात असल्याची जाणीव दि.१५ जुन २०१४ रोजी प्रथम मातापित्यांना झाली. त्या क्षणापासून आजवर शेकडो पुस्तके प्रकाशित होऊ शकतील एव्हढे हस्तलिखीत निर्माण झाले असून मकर संक्रांतीच्या पुर्वसंध्येला भोगीच्या मुहुर्तावर दत्तशुध्दिका नामक पुस्तिकेचे प्रकाशन झाले. गेल्या वर्षी १४ जाने २०१८ रोजी पहिले हस्तलिखीत  गुप्तज्ञान दत्ताश्रय प्रकाशित करण्यात आले होते.
यावेळी आपल्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतांना कंठसम्राट संतोषगीरी महाराज यांनी मनुष्य जीवनाचा सार थोडक्यात विषद केला. विवेकाला जागवून अविवेकाला खड्यासारखे बाजुला सारणे सोपे आहे. हे सोप्या भाषेत समजावून सांगतांना संतोषगीरी यांनी गहु, तांदूळ यासारखी उदाहरणे दिली. गहु किंवा तांदूळ स्वच्छ करतांना खडे निवडले जातात,खड्यांचे प्रमाण कमी असते म्हणून खडे निवडून धान्य स्वच्छ करणे सहज सोपे असते. मनुष्याच्या ठायी असलेले दुर्गुणही खड्यासारखे गुणांच्या तुलनेत कमी असल्यामुळे दुर्गुणांना निवडून बाहेर फेकणे सहज शक्य आहे. हे ज्यांना समजले त्यांचे जीवन भोगापासून योगाकडे धावत जाते आणि खऱ्या अर्थाने मोक्षप्राप्ती मिळते.
दि.१४ जानेवारी २०१९ रोजी काव्य विष्णूसदन येथे संपन्न झालेल्या दत्तशुध्दिका प्रकाशन सोहळ्यास ह.भ.प.संतोषगीरी महाराज यांच्यासोबत पोलीस निरिक्षक लोहकरे, पो.नि.नम्रता देसाई, नगरसेवक कमलेश बोडके, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डाॕ.राहुल जैन-बागमार, महासचिव कुमार कडलग, न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील, चेतन कवरे , दिलीप सुर्यवंशी, मनोज निकम, योगेश मोरे, दत्तु बोडके,अनिल भडांगे, कृष्णा मरकड ,ज्योती गोसावी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रकाशन सोहळ्याचे सुत्रसंचालन प्रा.किशोर येलमामे यांनी केले. अशोकराव थोरात,सुमनबाई थोरात, नंदाबाई येलमामे , निवृत्ती येलमामे  यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या  प्रकाशन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्रा.किशोर येलमामे,  संतोष भडांगे,भगवान येलमामे, सोमनाथ पवार , राजाराम ठाकरे,किरण मराठे, दीपक मराठे, ज्ञानेश्वर कालेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
"भोग मनुष्याच्या जीवन मार्गातील मोठा गतिरोधक आहे. भोगाला दुर सारल्याशिवाय योगप्राप्ती मिळणे अशक्य आहे. योगप्राप्ती साठी चित्तशुध्दी महत्वाची तर चित्तशुध्दीसाठी संयम महत्वपुर्ण असा गुण आहे. जो संयम शुध्दार्थाने धारण केला जातो तो  'सात्विक संयम!' असा सात्विक संयम धारण करणारा मनुज सतगुणशीलच असला पाहिजे. आपल्या आराध्यविषयीच्या सतभक्तीने किंवा निरंतर प्रामाणिक असा 'संयम' प्राप्त करता येतो.
-श्री विष्णूभक्त चारूदत्त

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नतीने पदस्थापना ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!